स्वच्छ शहर व निरोगी वातावरण देण्याचा मानस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:26 IST2019-01-14T22:26:28+5:302019-01-14T22:26:47+5:30
गोंदियावासीयांना स्वच्छ शहर व निरोगी वातावरण देण्याचा मानस आहे. आपल्या भोवतालचे वातारवण स्वच्छ व सुंदर असल्यास त्याचा नक्कीच आपल्या आरोग्य व स्वभावार प्रभाव पडतो. त्यामुळे गोंदियाला सर्व सुविधायुक्त शहरांच्या यादीत आणण्याचा आपला मानस असल्याचे नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील म्हणाले.

स्वच्छ शहर व निरोगी वातावरण देण्याचा मानस
गोंदियावासीयांना स्वच्छ शहर व निरोगी वातावरण देण्याचा मानस आहे. आपल्या भोवतालचे वातारवण स्वच्छ व सुंदर असल्यास त्याचा नक्कीच आपल्या आरोग्य व स्वभावार प्रभाव पडतो. त्यामुळे गोंदियाला सर्व सुविधायुक्त शहरांच्या यादीत आणण्याचा आपला मानस असल्याचे नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील म्हणाले.
मकर संक्रांतीचे निमित्त साधून ‘लोकमत’तर्फे राबविल्या जात असलेल्या ‘गुड बोला-गोड बोला’ अभियानांतर्गत ते बोलत होते. याप्रसंगी पाटील यांनी, आपले सण व उत्सव एकमेकांना जोडून ठेवण्यासाठी साजरे केले जातात. हीच एकता एखाद्या चांगल्या कामासाठी वापरल्यास नक्कीच त्याचे फलीतही चांगले लाभते. आमच्याबाबतीत तेच आहे. शहराचा चेहरा-मोहरा पालटण्यासाठी फक्त आम्हीच काही करू शकत नाही. शहरवासीयांच्या सहकार्याचीही तेवढीच गरज असल्याचे सांगीतले. यासाठी शहरवासीयांनी यांच्याकडील करांचा भरणा करून सहकार्य करावे असे अपेक्षीत आहे.
शिवाय, शासनाने प्लास्टीक बंदी केली आहे. प्लास्टीक हे वातावरण व आरोग्यासाठीही हानीकारक आहे. त्यामुळे एकजुटीने प्लास्टीक बंदीत सहभाग घ्यावा. यातूनच स्वच्छ शहर व निरोगी वातावरणाची निर्मिती होणार असे ते म्हणतात.
प्रत्येकच सण आपल्याला कही शिकवण देण्यासाठी आहे. मकर संक्रांतही गोड बोलण्याचा संदेश देते. त्यामुळे प्रत्येकाशी गोड बोलून व गोड वागूण रहावे. असे केल्यास शांत स्वभाव व स्वस्थ आरोग्य लाभणार.