दूधगाडीच्या धडकेत विद्यार्थिनी ठार; चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:55 IST2017-08-01T04:55:03+5:302017-08-01T04:55:03+5:30

मुंगली येथे सोमवारी सकाळी दूधसंकलन गाडीने दिलेल्या धडकेत कल्याणी नरेश कांबळे (११) या विद्यार्थिनीचा मृत्यू तर अन्य चार विद्यार्थी जखमी झाले.

Milk kills schoolgirl; Four injured | दूधगाडीच्या धडकेत विद्यार्थिनी ठार; चौघे जखमी

दूधगाडीच्या धडकेत विद्यार्थिनी ठार; चौघे जखमी

अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : मुंगली येथे सोमवारी सकाळी दूधसंकलन गाडीने दिलेल्या धडकेत कल्याणी नरेश कांबळे (११) या विद्यार्थिनीचा मृत्यू तर अन्य चार विद्यार्थी जखमी झाले.
मुंगली टोली येथील कल्याणी नरेश कांबळे हिच्यासह रोहिणी दौलत डोंगरवार (१०), हर्षा राजेश कापगते (१०), योगेश राजेश कापगते (६) व बादल तुलसीदास मेश्राम (७) हे गावातीलच जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत जात होते. मागून येणाºया दूधाच्या गाडीने दिलेल्या धडकेत कल्याणीचा जागीच मृत्यू झाला.
तर अन्य चार जखमी विद्यार्थ्यांना उपचारार्थ ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले. त्यापैकी एका विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून तीन विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या प्रकरणी नवेगावबांध पोलिसांनी चालक मधुकर हिरामण राऊत याला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Milk kills schoolgirl; Four injured