महावितरणमध्ये मीटरचे गौडबंगाल

By Admin | Updated: April 27, 2016 01:43 IST2016-04-27T01:43:42+5:302016-04-27T01:43:42+5:30

जिल्ह्यात एकीकडे पुरेशा प्रमाणात वीज मीटर उपलब्ध असल्याचे अधिकारी सांगत असले तरी ग्रामीण भागात मात्र मीटरचा तुटवडा जाणवत आहे.

Metropolitan Metropolitan Metropolitan Metropolitan Region | महावितरणमध्ये मीटरचे गौडबंगाल

महावितरणमध्ये मीटरचे गौडबंगाल

ग्रामीण भागात सदोष मीटर : अधिकारी म्हणतात, अतिरिक्त मीटरचा पुरवठा
गोंदिया : जिल्ह्यात एकीकडे पुरेशा प्रमाणात वीज मीटर उपलब्ध असल्याचे अधिकारी सांगत असले तरी ग्रामीण भागात मात्र मीटरचा तुटवडा जाणवत आहे. मिळालेले मीटर सदोष (फॉल्टी) असल्याचे ग्रामीण भागातील कर्मचारी सांगत आहेत. त्यामुळे मीटरचे हे गौडबंगाल नेमके काय आहे, अशी संभ्रमावस्था वीज ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे. दुसरीकडे पुरवठा झालेले अनेक मीटर सदोष निघत असल्यामुळे ते बदलविण्यासाठीही धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.
महावितरणच्या गोंदिया सर्कस अंतर्गत गोंदिया आणि देवरी हे दोन विभाग कार्यरत आहेत. त्यापैकी देवरी विभागात देवरी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, आमगाव आणि सालेकसा हे पाच तालुके येतात तर गोंदिया विभागात गोंदिया, तिरोडा व गोरेगाव या तीन तालुक्यांचा समावेश होतो. महावितरणच्या गोंदिया सर्कलमधील कार्यकारी अभियंता (प्रशासन) यांच्या म्हणण्यानुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या आर्थिक वर्षात ४२ हजार घरगुती मीटर जिल्ह्यात वाटण्यात आले. त्यापैकी ३१ हजार २७७ मीटर जुने आणि नादुरूस्त मीटर बदलविण्यासाठी वापरण्यात आले तर ९ हजार ९३८ मीटर नवीन जोडणीसाठी वापरले आहेत. आता १० हजार मीटर शिल्लक आहेत. याशिवाय एप्रिल महिन्यात देवरी आणि गोंदिया विभागांना प्रत्येक ४ हजार असे ८ हजार मीटर अतिरिक्त दिले आहेत. त्यामुळे मीटरसाठी कोणत्याही ग्राहकाची अडवणूक होणे शक्य नाही, असे हे अधिकारी ठामपणे सांगत आहेत.
आजघडीला देवरी विभागात ६३ आणि गोंदिया विभागात १५८ असे फक्त २२१ प्रस्ताव मीटरच्या प्रतीक्षेत असून त्यांची तपासणी करून त्यांना मीटर देण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. असे असले तरी ग्रामीण भागात मात्र वीज कर्मचाऱ्यांकडून चांगले मीटर उपलब्ध नसल्याची सबब सांगून मीटर लावण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे यात नेमके काय गौडबंगाल आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.मुख्य अभियंत्यांनी गेल्या आठवड्यात एक अध्यादेश काढून नादुरूस्त मीटर बदलवून ‘स्टँडर्ड आॅफ परफॉर्मन्स’ प्रमाणे मीटर लावण्याचा आदेश काढला. त्यामुळे महावितरणला सदोष (फॉल्टी) मीटरचा पुरवठा झाल्याच्या शंकेला दुजोरा मिळत आहे. मात्र महावितरणकडून याबाबत स्पष्टपणे काहीच न सांगता सर्वकाही ‘आॅल इज वेल’ असल्याचे भासविले जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
दोन कंपन्यांवर बंदी
गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील वीज ग्राहकांसाठी तुमसर येथे असलेल्या महावितरणच्या भांडार विभागातून साहित्याचा पुरवठा होतो. कोणत्या विभागासाठी किती मीटर मंजूर झाले त्याचे पत्र वरिष्ठांकडून आल्यानंतर तुमसरच्या भांडार विभागातून त्या साहित्याची उचल केली जाते. त्यात रोलेक्स आणि फ्लॅश या कंपन्यांच्या मीटरमध्ये बिघाड होत असल्यामुळे या कंपन्यांचे मीटर वापरू नका, असा स्पष्ट आदेश गेल्या १० मार्चला वरिष्ठ स्तरावरून महावितरणच्या कार्यालयांना देण्यात आला. त्यामुळे या मीटरच्या बदलीत दुसऱ्या कंपनीचे मीटर हवे असताना ते मिळत नसल्याची कुरबूर ग्रामीण भागात सुरू आहे.

 

Web Title: Metropolitan Metropolitan Metropolitan Metropolitan Region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.