मेटाडोर उलटून दोन मजूर ठार
By Admin | Updated: August 28, 2015 01:41 IST2015-08-28T01:41:10+5:302015-08-28T01:41:10+5:30
सालेकसावरून विद्युत खांब नेत असताना दरेकसा परिसरातील हाजराफॉलजवळ पहाडावर मेटॅडोर उलटल्याने दोन मजुर त्याखाली दबून ठार झाले.

मेटाडोर उलटून दोन मजूर ठार
हाजराफॉलजवळील अपघात : विद्युत खांब नेताना
सालेकसा : सालेकसावरून विद्युत खांब नेत असताना दरेकसा परिसरातील हाजराफॉलजवळ पहाडावर मेटॅडोर उलटल्याने दोन मजुर त्याखाली दबून ठार झाले. योगेश सुभाष मेंढे (१९) रा.सालेकसा आणि मुन्ना वातुलाल शहारे (५०) रा.मुरूमटोला अशी मृत मजुरांची नावे आहेत.
दरेकसा परिसरात सुदुर गावात विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. तिथे सालेकसावरून गुरूवारी (दि. २७) सकाळी १० वाजतादरम्यान मेटॅडोर (एमएचवाय ८४०९) याने विद्युत खांब नेल्या जात होते. दर्रेकसा येथील घाट चढत असताना चालक संदीप रोकडे याचा मेटॅडोरवरून ताबा सुटला व तो उलटला. यावेळी चार विद्युत खांबही खाली पडले. त्याखाली मजूरवर्ग दबल्या गेले.
दोन्ही मृत मजुरांसह नरेश पंधरे, अरविंद भोयर, महेश पंधरे, विजय बोरकर हे रस्त्यावरून मॅटाडोरच्या बाजूने चालत होते. अचानक मेटॅडोर उलटल्याने योगेश मेंढे आणि मुन्ना शहारे खांबाखाली दबून ठार झाले. विद्युतीकरणाचे काम नागपूर येथील ठेकेदार नरेंद्र पहाडे यांचे असून सर्व मजुर त्यांच्याकडे काम करीत होते. या घटनेने शोककळा पसरली आहे.