पोस्ट कार्डातून नेत्रदानाचा संदेश
By Admin | Updated: June 29, 2015 01:20 IST2015-06-29T01:20:44+5:302015-06-29T01:20:44+5:30
मरणानंतरही जीवंत राहण्यासाठी नेत्रदान करणे आवश्यक आहे. नेत्रदानासंदर्भात घराघरात जनजागृती व्हावी या उद्देशातून ...

पोस्ट कार्डातून नेत्रदानाचा संदेश
दीड हजार विद्यार्थ्यांचा सहभाग : तीन हजार कुटुंबात गेला चिमुकल्यांचा संदेश
गोंदिया : मरणानंतरही जीवंत राहण्यासाठी नेत्रदान करणे आवश्यक आहे. नेत्रदानासंदर्भात घराघरात जनजागृती व्हावी या उद्देशातून लोकमत बाल विकास मंचच्या पुढाकाराने मृणाल कोचिंग क्लास, नेत्रविभाग केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया पब्लिक स्कूल व एस.एस गर्ल्स महाविद्यालयात पोस्ट कार्डातून नेत्रदानाचा संदेश देणारे सुवाच्छ अक्षर व प्रभावी संदेश स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत दिड हजार चिमुकल्यांनी भाग घेतला होता.
आजच्या स्थितीत संदेश लिहीण्याकरीता पोस्ट कार्डची आवश्यकता नाही. ही प्रथा केव्हाचीच मोडली आहे. आधुनिक युगात ही पध्दत मोडली असून इंटरनेट व सोशल साईट्सच्या माध्यमातून कोणताही संदेश जगभरात पाठविता येते. इतिहास जमा होणाऱ्या पोस्ट कार्डच्या पध्दतीला आधार देण्याच्या हेतूने लोकमत बाल विकास मंचने हा पुढाकार घेतला. दि.२८ रोजी ही स्पर्धा घेतली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या दीड हजार बालकांना पोस्ट कार्डचे वाटप करण्यात आले. ही स्पर्धा ८ ते १५ वर्षासाठी अ गट तर १५ व त्यापेक्षा अधिक वयासाठी दुसरा ब गट तयार करण्यात आला आहे. नेत्रहिनांना सुंदर जग पाहण्याची संधी लाभावी यासाठी लोकमतने हा अभिनव उपक्रम अमंलात आणला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या बालकांना पोस्ट कार्ड दिल्यावर त्या पोस्ट कार्डावर त्या विद्यार्थ्याला आपल्या नातेवाईकाच पत्ता लिहावा लागला. त्याला बैठक क्रमांकही देण्यात आले. त्या विद्यार्थ्याला त्या कार्डावर सुवाच्च अक्षरात उत्कृष्ट मजकूर लिहावा लागला. नेत्रदानावर संदेश लिहिणाऱ्या या दीड हजार विद्यार्थ्यांपैकी प्रथम, व्दितीय, तृतीय दोन्ही गटात व प्रत्येक गटात पाच प्रोत्साहनपर असे एकूण १६ पुरस्कार देण्यात येणार आहेत. ज्या विद्यार्थ्याने या स्पर्धेत भाग घेतले त्या दिड हजार विद्यार्थ्यानी हा संदेश स्वत: घरी व त्या कार्डवर ज्या नातेवाईकांचे नाव लिहिले त्यांच्या घरी हा नेत्रदानाचा संदेश पोहचविण्यात आला. चिमुकल्यांनी नेत्रदानावर जनजागृती करतांना प्रिय नाना-नानी, प्रिय दीदी, प्यारी बुवा, प्यारे दादा, प्रिय मावशी असे भरपूर मनोरंजक शब्दही विद्यार्थ्यांनी त्या संदेश पत्रावर लिहीले. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने झाली. नेत्रविभागातील समूपदेशक अनुपम बन्सोड यांनी नेत्रदानावर मार्गदर्शन केले. स्पर्धेत पारदर्शकता राहावी यासाठी सर्व सहभागी बालकांना रोल नंबर देण्यात आले. यावेळी पाहुणे म्हणून मृणाल कोचिंग क्लासचे संचालक विमल असाटी, गोंदिया पब्लिक स्कूलचे अध्यक्ष प्रा. अर्जुन बुध्दे, सचिव डॉ. इंदिरा सपाटे, प्राचार्या रिता अग्रवाल, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रवी धकाते, अनुपम बन्सोड, दीपक थाटे, शैलेंद्र टेंभरे, डॉ. सुवर्णा हुबेकर उपस्थित होते. सदर स्पर्धेत चंचलबेन मनिभाई पटेल हायस्कूल, जानकीदेवी चौरागडे हायस्कूल, संस्कार कान्व्हेंट, व्ही.व्ही. कोचिंग क्लास, शारदा कान्व्हेंट, बी.बी.पब्लिक स्कूल येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेची प्रस्तावना संयोजक श्रीकांत पिल्लेवार, संचालन देवा भोयर यांनी तर आभार दिव्या भगत यांनी मानले. यशस्वीतेसाठी वर्षा भांडारकर, अतूल कडू, रूपेश डोंगरे, विजय हुकरे, वरूण खंगार, संतोष बिलोने यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)