गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:33 IST2021-09-06T04:33:25+5:302021-09-06T04:33:25+5:30

याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य आर. डब्लू. चव्हाण व संस्थेच्या संचालकांनी प्राचार्य एल. डी. बागडे यांच्या कार्यावर प्रकाश टाकून त्यांना आदरांजली ...

Meritorious students were felicitated | गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार

गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार

याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य आर. डब्लू. चव्हाण व संस्थेच्या संचालकांनी प्राचार्य एल. डी. बागडे यांच्या कार्यावर प्रकाश टाकून त्यांना आदरांजली अर्पण केली. दरम्यान, गुणवंत विद्यार्थिनी इयत्ता १० वीतील भाग्यश्री रोशन रामटेके, इयत्ता १२ वीतील स्नेहल हेमराज खोब्रागडे व कुमोदिनी हेमराज तुरकर यांचा प्रत्येकी १००१ रुपये रोख व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मिलिंद मागासवर्गीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामराव बन्सोड, अध्यक्ष एस. टी. बोरकर, आर. जी. बागडे, आर. एस. बोरकर, बक्षीस वितरक ज्वाला बागडे, टी. डी. बागडे, प्रीती रामटेके, के. एस. पटले, व्दारकाताई बागडे, विद्यालयाचे प्राचार्य चव्हाण, बी. एम. मालधे, जी. एन. कटरे, के. जी. धार्मिक, एस. एन. रामटेके, यु. आर. बागडे, ए. डी. बन्सोड, एस. वाय. भातनकर, एच. पी. कटरे, एन. आर. कुंभरे, डी. सी. कटरे, आर. बी. रहांगडाले, एन. एच. भगत, जी. डी. पुरी, डी. के. मेश्राम, एन. के. सिडामे, कापसे, दलित रामटेके आदी कर्मचारी व पाहुणे उपस्थित होते. संचालन दलित रामटेके यांनी केले. आभार एन. आर. कुंभरे यांनी मानले.

Web Title: Meritorious students were felicitated