गोंदियाच्या व्यापाऱ्याला नागपुरात लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:48 IST2021-02-05T07:48:43+5:302021-02-05T07:48:43+5:30

प्रवीण बजाज हे कापडाचे व्यापारी असून, गुरुवारी ते मुलगा आर्यन याच्यासह कापड खरेदीसाठी नागपूरला गेले होते. कापड खरेदीनंतर ते ...

The merchant of Gondia was robbed in Nagpur | गोंदियाच्या व्यापाऱ्याला नागपुरात लुटले

गोंदियाच्या व्यापाऱ्याला नागपुरात लुटले

प्रवीण बजाज हे कापडाचे व्यापारी असून, गुरुवारी ते मुलगा आर्यन याच्यासह कापड खरेदीसाठी नागपूरला गेले होते. कापड खरेदीनंतर ते रात्री ११ वाजता बसस्थानकावर पोहोचले. त्यावेळी गोंदियाकडे येणारी शेवटची बस निघून गेली होती व त्यामुळे ते बसस्थानकावरच रात्री थांबण्याच्या तयारीत होते. परंतु, त्याचवेळी एक व्यक्ती त्यांच्याजवळ आला व गोंदियाला जाण्याबाबत बोलला तसेच त्या बापलेकांना गोंदियाला जाण्यासाठी जाधव चौकात उभ्या असलेल्या कारमध्ये बसण्यास सांगितले. त्या कारमध्ये आधीच दोन व्यक्ती बसून होते. रात्री जवळपास ११ वाजता कार गोंदियाकडे जाणाऱ्या मार्गाऐवजी चुकीच्या रस्त्याने जात असता प्रवीण यांनी कारचालकाला टोकले. मात्र कारचालकाने एका गावाजवळील शेतात नेले व प्रवीण आणि त्यांच्या मुलाला कारमधून उतरवून बंदुकीने मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडील अडीच हजार रुपये, सोन्याचे दागिने व मोबाइल असा ८७ हजार ५०० रुपयांचा माल लुटला. त्यानंतर आरोपींनी प्रवीण व त्यांच्या मुलाला शेतात सोडून पळ काढला. प्रवीण यांनी शनिवारी गणेशपेठ पोलीस ठाण्यात पोहचून तक्रार नोंदविली आहे.

Web Title: The merchant of Gondia was robbed in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.