शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

मेहताखेडा नागपूर विभागात तिसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 21:28 IST

तालुक्यातील दुर्गम भागातील ग्राम मेहताखेडाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील प्रथम तर नागपूर विभागातून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. जिल्हयातून पहिल्या क्रमांकाचा पाच लाख रूपये व विभागातून तिसऱ्या क्रमांकाचा सहा लाख रुपयांचा पुरस्कार मिळविणारे तालुक्यातील एक स्वच्छ गाव म्हणून मेहताखेडा हे गाव नावारुपास आले आहे.

ठळक मुद्देसंत गाडगेबाबा स्वच्छता अभियान : जिल्ह्यात प्रथम क्रमांक, ११ लाखांचे पुरस्कार पटकावले

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यातील दुर्गम भागातील ग्राम मेहताखेडाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यातील प्रथम तर नागपूर विभागातून तिसरा क्रमांक पटकाविला आहे. जिल्हयातून पहिल्या क्रमांकाचा पाच लाख रूपये व विभागातून तिसऱ्या क्रमांकाचा सहा लाख रुपयांचा पुरस्कार मिळविणारे तालुक्यातील एक स्वच्छ गाव म्हणून मेहताखेडा हे गाव नावारुपास आले आहे.मेहताखेडा गावची विशेषता म्हणजे थोर संतांच्या नावानेच प्रवेश होतो. गावात ठिकठिकाणी ‘स्त्रियांचा सन्मान हिच मेहताखेडाची शान’ ही म्हण लिहिलेली आहे. याद्वारे गावात स्त्रियांचा सन्मान केला जात असून गावातील सर्व कुटुंबांचे घर व मालमत्ता ही स्त्रियांच्या नावानेच आहे.गावात प्रत्येक घरी शोषखड्डे आहेत. गावच्या बाजूला कंपनी असल्याने गावात रोजगार मिळाला आहे. प्रत्येक भिंतीवर सुविचार आहेत. या गावात सर्व घरे मातीची असून ति ही स्वच्छ आहेत. तसेच गावात रोज सकाळ व सायंकाळ ६ वाजता ग्रामपंचायत अंतर्गत स्वयंचलित साऊंड संचद्वारे स्वच्छता विषयक प्रार्थना व चांगले विचार पोहोचविले जातात. यात आदर्श गाव वाटोडाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचेही विचार याद्वारे ऐकविले जातात. यासोबतच गावात पूर्णत: दारुबंदी आहे. गावात हायमास्य लाईट आदिंची सोय असून डिजीटल बोर्ड लावले असून त्यात वेळ, दिनांक व तापमान दररोज दर्शविले जाते.मेहताखेडाला आदर्श गाव करण्यासाठी गावकऱ्यांनी खूप मदत व मेहनत केली आहे. हे आदर्श गाव येथील ग्रामसेवक सुमेध बंसोड यांच्या नवनवीन कल्पना, सामाजिक भावना तसेच उच्चशिक्षीत सरपंच महाराजी जगत सलामे व उपसरपंच आसोबाई अरकरा, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुंजाम, मन्नू मडावी, माधुरी नरेटी, उषा मडावी, कल्पना सर्पा, यमुना कुंजाम, उपसिंग सर्पा व सर्व गावकºयांच्या सहकार्याने मोठे झाले आहे.वॉटर एटीएमला पुलवामा शहिदांचे नावयेथील गावकऱ्यांनी शुद्ध पिण्याच्या थंड पाण्याची वॉटर एटीएमद्वारे सोय उपलब्ध करुन दिली आहे. शुद्ध पाण्याच्या दोन्ही वाटर एटीएमला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले शहीद नितीन राठोड व शहीद संजयसिंग दिक्षीत यांची नावे देवून देशाभिमान जागृत केला आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान