मेडिकल कॉलेजसाठी आमदारांनी घेतली बैठक
By Admin | Updated: September 27, 2015 01:23 IST2015-09-27T01:23:54+5:302015-09-27T01:23:54+5:30
महाराष्ट्र विधानमंडळ लोक लेखा समितीचे प्रमुख व आ. गोपालदास अग्रवाल यांची गोंदियात प्रस्तावित शासकीय मेडिकल ..

मेडिकल कॉलेजसाठी आमदारांनी घेतली बैठक
गोंदिया : महाराष्ट्र विधानमंडळ लोक लेखा समितीचे प्रमुख व आ. गोपालदास अग्रवाल यांची गोंदियात प्रस्तावित शासकीय मेडिकल कॉलेजच्या तयारीस घेवन महत्त्वपूर्ण बैठक जिल्हा रूग्णालयात अनेक प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.
याप्रसंगी आ. अग्रवाल म्हणाले, सर्व तांत्रिक अडचणींना मेडिकल काँशिल आॅफ इंडिया (एमआयसी), केंद्र व राज्य सरकारच्या स्तरावर दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या विषयाला घेवून उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर लवकरच निर्णय होणार आहे. हे निर्णय आम्हा सर्वांच्या पक्षात लागेल, असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयातील अनेक अनियमितता व समस्यांबाबत अधिकाऱ्यांना खडसावले व आपल्या कर्तव्याप्रती सजग राहण्याचे निर्देश दिले. आ. अग्रवाल यांनी याप्रसंगी सर्व प्रमुख वार्डांचे निरीक्षण केले व रूग्णांना त्यांच्या आरोग्याविषयी विचारणा केली.
याप्रसंगी प्रामुख्याने गोंदिया मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश कळमकर, काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंह गुलाटी, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चौधरी, सर्व डॉक्टर, संबंधित स्टॉफ व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)