विविध शासकीय योजनांच्या मेळाव्याचे आयोजन रविवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:31 IST2021-08-27T04:31:25+5:302021-08-27T04:31:25+5:30

सडक-अर्जुुनी : तालुका विधी सेवा समिती, वकील संघ व पंचायत समितीच्या संयुक्त वतीने रविवारी (दि.२९) सकाळी ९.३० वाजता तालुक्यातील ...

Meeting of various government schemes is organized on Sunday | विविध शासकीय योजनांच्या मेळाव्याचे आयोजन रविवारी

विविध शासकीय योजनांच्या मेळाव्याचे आयोजन रविवारी

सडक-अर्जुुनी : तालुका विधी सेवा समिती, वकील संघ व पंचायत समितीच्या संयुक्त वतीने रविवारी (दि.२९) सकाळी ९.३० वाजता तालुक्यातील ग्राम जांभळी येथे आदिवासी समाज तसेच सर्व ग्रामस्थांसाठी विविध शासकीय योजनांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी व इतर ग्रामस्थांना एकाच दिवशी एकाच छताखाली विविध शासकीय योजनांची संपूर्ण माहिती मिळावी. या उद्देशातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात प्रामुख्याने तहसील कार्यालय, पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, ग्रामीण रुग्णालय, समाज कल्याण, महिला व बाल विकास, जिल्हा उद्योग केंद्र, आदिवासी प्रकल्प कार्यालय, पशुधन विभाग, उपवन संरक्षण, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका कृषी विभाग, उमेद तसेच शासकीय बँक यांच्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांचे प्रदर्शन व स्टॉल लावले जाणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष विक्रम आव्हाड यांनी कळविले आहे.

Web Title: Meeting of various government schemes is organized on Sunday