शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

कुपोषणाच्या मुद्दावर गाजली स्थायी समितीची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 9:54 PM

जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यात जिल्हा आरोग्य व संबंधित विभाग पूर्णपणे अपयशी ठरले आहे. परिणामी कुपोषणाच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे कुपोषणाच्या समस्येवर ठोस उपाय योजना करण्यात यावी, असा मुद्दा जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी लोकमतमधील बातम्यांचा दाखला देत सभागृहात उपस्थित केला.

ठळक मुद्दे६४ जण नोकरीपासून वंचित : लोकमतच्या वृत्ताची दखल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यात जिल्हा आरोग्य व संबंधित विभाग पूर्णपणे अपयशी ठरले आहे. परिणामी कुपोषणाच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे कुपोषणाच्या समस्येवर ठोस उपाय योजना करण्यात यावी, असा मुद्दा जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी लोकमतमधील बातम्यांचा दाखला देत सभागृहात उपस्थित केला. त्यामुळे स्थायी समितीची सभा कुपोषणाच्या मुद्दावरच गाजली.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा बुधवारी (दि.१०) जि.प.च्या सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी सीमा मडावी, उपाध्यक्ष अकबर अल्ताफअली, महिला बाल कल्याण सभापती लता दोनोडे, शिक्षण सभापती रमेश अंबुले, विरोधी पक्षनेते गंगाधर परशुरामकर, जि.प.सदस्य पी.जी.कटरे, उषा शहारे, सुरेश हर्षे, शोभेलाल कटरे, रजनी कुंभरे व अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी हासमी उपस्थित होते. सभेला सुरुवात होताच गंगाधर परशुरामकर यांनी लोकमतमध्ये ३० जून रोजी प्रकाशित बातमीवरून चर्चा घडवून आणली. तसेच कुपोषणावर काय उपाय योजना केली असा मुद्दा उपस्थित करुन आरोग्य यंत्रणेला धारेवर धरले. तर सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे ३२ ग्रामपंचायत परिचर व ३२ अनुकंपाधारक नोकरीपासून वंचित आहेत. तिरोडा तालुक्याच्या डब्बेटोला येथील घरकुलाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर १९ जुलैला या संदर्भात आदेश देणार असल्याचे सांगण्यात आले.घरकुलाच्या रकमेची अफरातफर करण्यात आल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते.तसेच लोकमतने १२ जून रोजी बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. या बातमीवरही चर्चा करून सदर कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यावर संबंधित कंपनीवर कारवाही करण्याचे आश्वासन अध्यक्षांनी दिले. सभेत इतर विषयावर चर्चा करण्यात आली.

टॅग्स :zpजिल्हा परिषद