शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

शास्त्रीय सल्लागार समितीची सभा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 21:39 IST

तालुक्यातील ग्राम हिवरा येतील कृषी विज्ञान केंद्रात १३ वी शास्त्रीय सल्लागार समितीची सभा उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी अकोला येथील डॉ. प.जे. कृषी विद्यालयाचे संचालक डॉ.डी.एम.मानकर होते.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील ग्राम हिवरा येतील कृषी विज्ञान केंद्रात १३ वी शास्त्रीय सल्लागार समितीची सभा उत्साहात पार पडली.अध्यक्षस्थानी अकोला येथील डॉ. प.जे. कृषी विद्यालयाचे संचालक डॉ.डी.एम.मानकर होते. याप्रसंगी विभागीय कृषी संशोधन केंद्राच्या सहायक संचालक व वरिष्ठ संशोधक डॉ. उषा आर.डोंगरवार, प्रभारी कार्यक्रम समन्वयक डॉ.एन.एस.देशमुख, नाबार्डचे सह जिल्हाव्यवस्थापक निरज जागरे, तालुका कृषी अधिकारी डी.एम.तुमडाम, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक मनोज नासरे, सुनील सोसे, प्रगतीशील शेतकरी रेखलाल टेंभरे प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ.मानकर यांनी, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये कृषीशी निगडीत सर्व विभागांनी मिळून कार्य करणे गरजेचे आहे. किडींच्या नियंत्रणासाठी जैविक किटकनाशक व बुरशीनाशक नागपूर कृषी महाविद्यालयातून उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली. तसेच त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील सध्याची शेतीची स्थिती जाणून घेताना कृषी विद्यालयातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करतील असे निर्देश दिले.धान पिकाची फेरपालट शक्य असल्यास करावी तसेच गोंदिया जिल्ह्यातील हवामान लाख शेती, फळबाग लागवड व रेशीम शेतीसाठी पोषक असून त्यापासून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होऊ शकतो असे सांगितले.डॉ. डोंगरवार यांनी, शेतकऱ्यांनी श्री व पट्टा पद्धतीने लागवड, चिखलनीच्या वेळी शक्य असल्यास गराडीचा पाला गाडावा त्यामुळे धानावर होणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी करता येतो. तसेच विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही, नवेगावबांध व साकोली येथे विद्यापीठ संशोधीत सत्यप्रत बियाणे उपलब्ध असतात. शेतकऱ्यांनी या संशोधीत बियाण्यांची लागवड करावी असे सांगीतले.डॉ. देशमुख यांनी, भविष्यात कृषी विज्ञान केंद्रामार्फत जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. जागरे यांनी, नाबार्डच्या विविध योजनांचा लाभ विभागनिहाय घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा असे आवाहन केले.तुमडाम यांनी, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाºया विविध योजनांची माहिती दिली. कृविके मार्फत शेतकºयांना यांत्रिकीकरणाचे प्रशिक्षण देण्यात यावे असे सुचविले. नासरे यांनी, आत्मा यंत्रणेद्वारे राबविण्यात येणाºया योजनांची माहिती दिली व जिल्ह्यातील विविध शेतकरी गटांना सेंद्रीय शेती विषयी प्रशिक्षण देण्यात यावे असे सुचविले.टेंभरे, यांनी शेतातील उत्पादीत मालाची विक्री व्यवस्था यावर चर्चा केली व जिल्ह्यातील काही शेतकºयांकडे धानाच्या प्राचीन व अत्यंत चविष्ट जाती आजही सांभाळून ठेवल्याचे सांगीतले.संचालन जी.आर.खेडीकर यांनी केल. आभार डॉ. सविता पवार यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. हरिश भोंगाडे, ज्ञानेश्वर पटले, हितेश येळे, धनीराम भाजीपाले, संतोष बिसेन, मनोज कोरे, जीवन जिल्हारे, एम.व्ही.भोमटे, आर.डी.चव्हाण, डॉ. सविता पवार, आर.पी.चव्हाण, सोमनाथ गवते, पी.एन.रामटेके तसेच इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Agricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्र