सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची बुधवारी सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2016 02:17 IST2016-07-27T02:17:30+5:302016-07-27T02:17:30+5:30
महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा आरमोरीच्या वतीने तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची बुधवारी सभा
निवड श्रेणीच्या प्रश्नांवर होईल चर्चा
आरमोरी : महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा आरमोरीच्या वतीने तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त शिक्षकांची सभा २७ जुलैै रोजी बुधवारला सकाळी ११ वाजता येथील शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
या सभेला समितीचे अमरावती येथील राज्याध्यक्ष सा. चं. इंगळे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. १९६८ ते १९८५ या कालावधीत कार्यरत तसेच सेवानिवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर होणे प्रलंबित आहे. याबाबत जीआर निघाला नाही. या संदर्भात न्याय मिळविण्यासाठी समितीच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करावयाची असल्याच्या मुद्यावर या सभेत चर्चा होणार आहे. सदर सभेला सेवानिवृत्त शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सोनकुसरे व आरमोरी तालुकाध्यक्ष एन. एन. वडपल्लीवार यांनी केले आहे.