गोंदिया तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

By Admin | Updated: March 17, 2016 02:32 IST2016-03-17T02:32:46+5:302016-03-17T02:32:46+5:30

तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त सभा सोमवार (दि.१४) राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली येथे जिल्हा अध्यक्ष विनोद हरिणखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

Meeting of Gondia taluka and city NCP | गोंदिया तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

गोंदिया तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक

संघटीत होऊन कार्य करा : शेतकऱ्यांच्या हितार्थ राष्ट्रवादीची मोहीम
गोंदिया : तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त सभा सोमवार (दि.१४) राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली येथे जिल्हा अध्यक्ष विनोद हरिणखेडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत शहराच्या प्रभाग-१ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी इच्छुक उमेदवारांना आवेदन करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच खा. प्रफुल्ल पटेल व आमदार राजेंद्र जैन यांनी घेतलेल्या निर्णयावर सर्वांनी अमल करण्याचे निवेदन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाद्वारे शेतकऱ्यांच्या हितात उच्च न्यायालयात राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेश प्रमुख अन्ना धोंडगे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची माहिती देण्यात आली. जिल्हाध्यक्ष हरिणखेडे यांनी सदर जनहित याचिकेच्या समर्थनात शेतकरी-शेतमजूर कृती समितीद्वारे तयार केलेले अर्ज भरून उच्च न्यायालयात सर्व शेतकऱ्यांद्वारे पाठविण्याचे आवाहन कार्यकर्ते व सर्व पदाधिकाऱ्यांना केले.
सभेला शहर अध्यक्ष शिव शर्मा, तालुकाध्यक्ष कुंदन कटारे, बालकृष्ण पटले, प्रदेश प्रतिनिधी अशोक गुप्ता, सूरज गुप्ता, हुकूमचंद अग्रवाल, जिल्हा प्रवक्ता अशोक शहारे, नगरसेविका सुशीला भालेराव, शहर महिला अध्यक्ष आशा पाटील, नरेंद्र हालानी आदींनी संबोधित केले.
सभेत सभापती चुन्नी बेंदरे, रवी मुंदडा, गणेश बरडे, भोजराज चुलपार, जितेश टेंभरे, तिर्थराज हरिणखेडे, अखिलेश सेठ, शैलेश वासनिक, अचल गिरी, मोहन पटले, मोती कुरील, प्रतिक भालेराव, रमेश गौतम, विनायक खैरे, अशोककुमार जैन, मदन चिखलोंडे, धर्मेश अग्रवाल, डॉ. नितीन तुरकर, दीपक कनोजे, रविकुमार पटले, नितीन टेंभरे, दुर्योधन मेश्राम, योगराज लिल्हारे, केवलराम रहांगडाले, डॉ. ओमप्रकाश मदारकर, रौनक ठाकूर, करण टेकाम, वामन गेडाम, कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Meeting of Gondia taluka and city NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.