प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST2021-03-18T04:28:41+5:302021-03-18T04:28:41+5:30

तिरोडा : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील) या संघटनेच्या ...

Meet the pending demands of primary teachers | प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा

तिरोडा : तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील) या संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी प्रकाश गंगापारी व गट शिक्षणाधिकारी मधुकर पारधी यांना भेटून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सर्वप्रथम डॉ. प्रकाश गंगापारी यांनी गटविकास अधिकाऱ्याचे प्रभार घेतल्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच प्रलंबित मागण्यावर चर्चा करण्यात आली.

यावेळी दिलेल्या निवेदनातून बारा वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांचे प्रस्ताव चट्टोपाध्याय वेतन श्रेणीसाठी व २४ वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांचे प्रस्ताव निवड श्रेणीसाठी जि.प.ला पाठविणे, जिल्हा परिषद शाळेचे विद्युत बिल ग्रामपंचायतकडून भरण्यात यावे, वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले मंजुरीसाठी त्वरित पाठविणे, आजारी व अर्जित रजा प्रकरणे निकाली काढण्यात यावे, सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, गोपनीय अहवालाची एक प्रत प्रत्येक शिक्षकांना देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश होता.

Web Title: Meet the pending demands of primary teachers