कार उलटून मेडिकल व्यावसायिक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:53 IST2021-03-13T04:53:45+5:302021-03-13T04:53:45+5:30

गोंदिया : सायकल चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगात असलेली कार झाडावर आदळल्याने गोंदियाचा तरुण मेडिकल व्यावसायिक जागीच ठार झाला. ...

Medical professional killed in car overturn | कार उलटून मेडिकल व्यावसायिक ठार

कार उलटून मेडिकल व्यावसायिक ठार

गोंदिया : सायकल चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगात असलेली कार झाडावर आदळल्याने गोंदियाचा तरुण मेडिकल व्यावसायिक जागीच ठार झाला. रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत गोंदिया-बालाघाट मार्गावरील ग्राम अंभोराजवळ शुक्रवारी (दि.१२) सकाळी ९.३० वाजेदरम्यान ही घटना घडली. अतुल गणेशप्रसाद अग्रवाल (३६, रा.गोंदिया), असे अपघातात ठार झालेल्या मेडिकल व्यावसायिकाचे नाव आहे.

अतुल अग्रवाल याचे रावणवाडी येथे मुक्ता मेडिकल नावाने दुकान असून, सकाळी दुकान उघडण्यासाठी तो कार (क्र. एमएच ३५ एजी ८७०३) ने जात होता. अंभोरा गावाजवळ त्याच्या वाहनासमोर सायकलस्वार आला व त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली. या अपघातात अतुल जागीच ठार झाला. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे. तपास हवालदार गौतम गवरे करीत आहेत.

Web Title: Medical professional killed in car overturn