शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मुख्यालयाला ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST

प्राथमिक आरोग्य केंद्राचा पदभार सांभाळणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कुळकर्णी या सुमारे १५ कि.मी. अंतरावरील ग्राम झरपडा या आपल्या स्वगावावरून तर डॉ. कुलसुंगे हे बोंडगावदेवी वरून ये-जा करित असल्याचे सांगीतले जाते. पीएचसीची कमान सांभाळणाऱ्या डॉ. कुळकर्णी यांना आणायला पीएचसीची गाडी नित्यनेमाने त्यांच्या राहत्या गावी किंवा अर्जुनी-मोरगावला जात असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देचान्ना आरोग्य केंद्रातील प्रकार : ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय, वरिष्ठांनी दखल घ्यावी

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : गावातील शेवटच्या टोकापर्यंत आरोग्य सेवा पोहचावी म्हणून शासन स्तरावरून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. गावखेड्यात प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण झाले. प्रशस्त व सुसज्ज अशा रंगरंगोटीसह आरोग्य केंद्राच्या इमारती बांधण्यात आल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयीयुक्त निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. सर्व सोयी व आकर्षक अशा सेवेचा मेहनताना असताना सुद्धा मुख्यालयी न राहता सोयीच्या ठिकाणावरून वैद्यकीय अधिकारी ये-जा करित असल्याचा प्रकार जवळच्या ग्राम चान्ना बाक्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मागील काही दिवसांपासून सर्रासपणे सुरू आहे.आरोग्य सेवेपासून गावखेड्यातील सर्वसामान्य वंचित राहू नये म्हणून वाहतुकीचे जाण्या-येण्याचे कोणतेही साधन नसताना ग्राम चान्ना-बाक्टी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मागील काही वर्षांपासून सुरू करण्यात आले आहे. बोंडगावदेवी परिसरातील बहुतेक गावांचा या प्राथमिक आरोग्य केंद्रात समावेश करण्यात आला आहे. आजघडीला सदर प्राथमिक आरोग्य केंद्राची कमान वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी (डोंगरगाव) यांच्यासह डॉ. कुंदन कुलसुंगे यांच्याकडे आहे. डॉ. कुळकर्णी या नागपूर वरून इथे रूजू झाल्या तर डॉ. कुलसुंगे हे बोंडगावदेवीच्या जि.प.आयुर्वेदीक दवाखान्यातून रूजू झाल्याची माहिती आहे. सध्या स्थितीत दोन्ही वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याची जनतेची ओरड आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचा पदभार सांभाळणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कुळकर्णी या सुमारे १५ कि.मी. अंतरावरील ग्राम झरपडा या आपल्या स्वगावावरून तर डॉ. कुलसुंगे हे बोंडगावदेवी वरून ये-जा करित असल्याचे सांगीतले जाते. पीएचसीची कमान सांभाळणाऱ्या डॉ. कुळकर्णी यांना आणायला पीएचसीची गाडी नित्यनेमाने त्यांच्या राहत्या गावी किंवा अर्जुनी-मोरगावला जात असल्याची माहिती आहे. शासकीय वाहन आपल्या सोयीनुसार वापरण्याचा प्रकार सर्रास होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील जनता बाहेरगावावरून ये-जा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची तासन तास प्रतीक्षा करित असल्याचे दिसून येत आहे. सर्व सोयीयुक्त निवासाची सोय असताना वैद्यकीय अधिकारी ‘खो’ देत असल्याचा प्रकार सध्या पीएचसीमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची वरिष्ठांनी दखल घेवून कारवाई करण्याची मागणी आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल