मेडिकलला दिली डिफिब्रिलेटर मशीन भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:20 IST2021-07-16T04:20:44+5:302021-07-16T04:20:44+5:30
या डिफिब्रिलेटर मशीनचा लाभ हा कोविड रुग्णांना होणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, प्राध्यापक व विभागप्रमुख ...

मेडिकलला दिली डिफिब्रिलेटर मशीन भेट
या डिफिब्रिलेटर मशीनचा लाभ हा कोविड रुग्णांना होणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे,
प्राध्यापक व विभागप्रमुख पीएसएम डॉ. सुभाष ठाकरे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप गेडाम यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.
डिफिब्रिलेटर मशीन प्राप्तीसाठी समाजसेवा विभागातील सर्व समाजसेवा अधीक्षक यांनी विशेष प्रयत्न करुन समन्वयाची भूमिका पार पाडली. जी. टी. हॉस्पिटल मुंबईचे डफरे, विजय गायकवाड व जीएमसी अकोलाचे संदीप चुनडे यांनी यासाठी सहकार्य केले.
ही डिफिब्रिलेटर मशीन समाजसेवा विभाग यांच्याकडून अधिष्ठाता यांच्याकडे हस्तांतरण करण्यात आली. अधिष्ठाता यांनी या मशीन बाबत जीवोत्रोनिक प्रा. लि. कंपनी पुणे यांचे आभार मानले. यावेळी कोविड नोडल अधिकारी डॉ. आशिष लोथे, कटरे, समाजसेवा अधीक्षक कुचनकर, लांजेवार, डोंगरे, खांडेकर, भिवसाने, धनवीर, खोटे उपस्थित होते.