मेडिकल कॉलेज विद्यार्थ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:34 IST2021-09-14T04:34:31+5:302021-09-14T04:34:31+5:30

गोंदिया : येथील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप (आंतरवासिता) करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये असलेल्या उणीवांना घेऊन काळ्या फिती लावून सोमवारी (दि.१३) ...

Medical college students protest with black ribbons () | मेडिकल कॉलेज विद्यार्थ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन ()

मेडिकल कॉलेज विद्यार्थ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन ()

गोंदिया : येथील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप (आंतरवासिता) करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये असलेल्या उणीवांना घेऊन काळ्या फिती लावून सोमवारी (दि.१३) आंदोलन केले.

मेडिकलमधील प्रत्येक वॉर्डात पोलिसांची सिक्युरिटी लावा, रिक्त असलेली विभाग प्रमुखांची व प्रोफेसर यांच्या रिक्त जागा भरा, दोन महिन्यापासून न दिलेले विद्या वेतन त्वरित द्या, महाविद्यालयात व्हिडिओ कॅमेरे लावा अशा मागण्यांना घेऊन अंतिम वर्षातील ५० विद्यार्थ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. या मागण्यांच्या संदर्भात अधिष्ठाता पी. व्ही. रूखमोडे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात ४ पोलीस कर्मचारी नियुक्त आहेत. सोबतच सुरक्षारक्षक म्हणून खासगी लोकांना कामावर ठेवण्यात आले आहेत. परंतु ही सुरक्षा अपुरी असल्याने प्रत्येक वाॅर्डात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. मेडिकल कॉलेजमध्ये भरती असलेल्या रूग्णांचे नातेवाईक वारंवार आपल्या रूग्णांच्या प्रकृती संदर्भात डॉक्टरांना विचारणा करायला येत असल्याने डॉक्टर आणि रूग्णांच्या नातेवाईकांत शाब्दिक चकमक होते. याला आळा घालण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी रेटून धरली.

Web Title: Medical college students protest with black ribbons ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.