मेडिकलच्या कारभारावर एमसीआयचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 06:00 AM2019-12-14T06:00:00+5:302019-12-14T06:00:06+5:30

प्राध्यापक व विद्यार्थ्यांना महिला रुग्णालयाच्या तपासणीसाठी वारंवार रस्ता ओलांडून जावे लागत असल्यावर नाराजी व्यक्त केली. इमारत बांधकामाला प्राधान्य देत वैद्यकीय महाविद्यालय एकाच परिसरात आणण्याचे निर्देश दिले. यासर्व बाबीकंडे त्वरीत लक्ष न दिल्यास भविष्यात वैद्यकीय प्रवेशात अडचण निर्माण होण्याची शक्यताही चमूने वर्तविली.

MCI's coment on Medical work | मेडिकलच्या कारभारावर एमसीआयचे ताशेरे

मेडिकलच्या कारभारावर एमसीआयचे ताशेरे

Next
ठळक मुद्देप्रवेशाबाबत शंका : कामकाजात सुधारणा करण्याचे दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालातील (मेडिकल) सावळा गोंधळ अद्यापही कायम आहे. कधी औषधांचा तुडवडा तर कधी रुग्णांची गैरसोय यामुळे हे मेडिकल कॉलेज नेहमीच चर्चेत असते. मेडिकलच्या इमारत बांधकामाचा प्रश्न सुध्दा रेंगाळला असल्याने विविध समस्या निर्माण झाल्या आहे. त्यात मेडिकल कॉउन्सील ऑफ इंडिया (एमसीआय) च्या चमूने दोन दिवसांपूर्वीच मेडिकलला भेट देऊन सोयी सुविधांची पाहणी केली. तेथील असुविधांवर नाराजी व्यक्त करीत मेडिकलच्या कारभारावर ताशेरे ओढल्याची माहिती आहे.
मेडिकलसाठी कुडवा परिसरात जागा निश्चित करण्यात आली आहे. पाच वर्षांच्या कालावधी लोटूनही बांधकामाला सुरूवात केली नाही. त्यामुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत चार सत्रातील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात या महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा की नाही, यावर मंथन करण्यासाठी मेडिकल कॉउन्सील ऑफ इंडिया (एमसीआय) च्या चमूने सोमवार व मंगळवारी वैद्यकीय महाविद्यालय परिसराची पाहणी केली. मागील पाच वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेवर अद्यापही बांधकामाला सुरवात न झाल्याने यावर चमूने तीव्र नाराजी व्यक्त केली. चमूमध्ये गुजरातमधील सुरत येथील डॉ. सचेंद्रकुमार श्रीवास्तव यांच्या नेतृत्वातील, आंध्रप्रदेशातील डॉ.बी.मनोहर, आणि मध्यप्रदेशातील दातिया डॉ.गौर यांचा समावेश होता. महाविद्यालय परिसरात अधिष्ठाता डॉ. व्ही.पी.रुखमोडे यांच्या कक्षात महाविद्यालयातील आस्थापनेवरील पदांची माहिती घेतली.
प्राध्यापक व विद्यार्थ्यांना महिला रुग्णालयाच्या तपासणीसाठी वारंवार रस्ता ओलांडून जावे लागत असल्यावर नाराजी व्यक्त केली. इमारत बांधकामाला प्राधान्य देत वैद्यकीय महाविद्यालय एकाच परिसरात आणण्याचे निर्देश दिले. यासर्व बाबीकंडे त्वरीत लक्ष न दिल्यास भविष्यात वैद्यकीय प्रवेशात अडचण निर्माण होण्याची शक्यताही चमूने वर्तविली.
या चमूने बाई गंगाबाई रुग्णालय आणि केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्वच वार्डांची, औषध केंद्रासह परिसराचे निरीक्षण केले. शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाकरिता कुडवा येथील ६० एकर जमीन आरक्षित केली आहे. त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. मात्र अद्याप इमारत बांधकामाचा मुहूर्त सापडलेला नाही.

Web Title: MCI's coment on Medical work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.