चान्ना येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात मातृवंदन सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:34 IST2021-09-24T04:34:01+5:302021-09-24T04:34:01+5:30
उद्घाटन सरपंच देवकाबाई मरस्कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी, आरोग्य सहायक व्ही. बी. शेंडे, ...

चान्ना येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात मातृवंदन सप्ताह
उद्घाटन सरपंच देवकाबाई मरस्कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी, आरोग्य सहायक व्ही. बी. शेंडे, मंदा नंदेश्वर, रंजना राखडे, आशा गटप्रवर्तक रेखा कोसरे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. कुळकर्णी यांनी प्रधानमंत्री मातृवंदन योजनेविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. ग्रामस्तरावर प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचे २६ लाभार्थ्यांचे आवेदनपत्र भरण्यात आली. बँक व पोस्ट येथे आयपीपीबी खाते काढण्यात आले. लाभार्थ्यांच्या आधार कार्डची नोंद दुरुस्त करण्यात आली. पोषण व स्वच्छता दिवस केंद्र अंतर्गत साजरे करण्यात आले. २२ लाभार्थ्यांचे आवेदनपत्रे अद्ययावत करण्यात आले. अशा प्रकारे विविध उपक्रमांनी प्रधानमंत्री मातृवंदन सप्ताह साजरा करण्यात आला. सप्ताहासाठी केंद्राअंतर्गत पदाधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका यांनी सहकार्य केले.