कोविडच्या उपचारासाठी वापरलेले साहित्य उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:28 IST2021-04-25T04:28:58+5:302021-04-25T04:28:58+5:30
गोंदियात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. गोंदियातील शासकीय दवाखाने व खासगी दवाखान्यांचे कोविड रुग्णांकरिता वापरले जाणारे साहित्य डम्पिंग ग्राउंडवर ...

कोविडच्या उपचारासाठी वापरलेले साहित्य उघड्यावर
गोंदियात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. गोंदियातील शासकीय दवाखाने व खासगी दवाखान्यांचे कोविड रुग्णांकरिता वापरले जाणारे साहित्य डम्पिंग ग्राउंडवर फेकले जात आहे. यामुळे डम्पिंग ग्राउंडला टेकडीचे रूप आले आहे. येथे कोविड रुग्णांचा अत्यंसंस्कार मातीत पुरून करण्यात आल्याची माहिती आहे. या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जवळच्या पार्वती घाट व आश्रमच्या मागील कॉलनीत निवासी घरे आहेत. त्यामुळे या परिसरात कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. स्थानिक नागरिकांनी उपविभागीय अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनसुद्धा दिले आहे. डम्पिंग ग्राउंडवरील कचरा हटवून सामान्य माणसांच्या जीवाशी खेळ होऊ नये याकरिता ताबडतोब कचरा उठवण्याची मागणी निवासी नरेंद्र मिश्रा, योगेश पांडे, किशोर नखाते, देवेंद्र श्रीवास, राजू सिले, आशिष शर्मा, शुभम तिवारी, प्रमुख मिश्रा, अनिल यांनी केली आहे.