गोंदिया : येथील रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर उभ्या असलेल्या अपघात मदत वैद्यकीय व्हॅनच्या कोचला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी (दि.२) सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास घडली. काही क्षणात आग वाढल्याने कोचमधील साहित्य व सीट जळून राख झाल्या. रेल्वे कर्मचाऱ्यांनी वेळीच उपाययोजना करीत आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या घटनेमुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर काही वेळ तारांबळ उडाली होती.
प्राप्त माहितीनुसार गोंदिया रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर नेहमी अपघात मदत वैद्यकीय व्हॅन उभी असते. मंगळवारी सकाळी१०:३० वाजताच्या सुमारास या व्हॅनच्या एका कोचमधून धूर निघत असल्याने रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांना दिसले. तसेच हा प्रकार रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांंनी अपघात मदत व्हॅनकडे धाव घेतली. अग्निशामक यंत्र व पाण्याचा मारा करुन कोचला लागलेली आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. काही वेळातच आग आटोक्यात आली. मात्र आगीमुळे
कोचमधील संपूर्ण सीट्स आणि वैद्यकीय मदतीचे साहित्य काही प्रमाणात जळाल्याने नुकसान झाले. मात्र या घटनेमुळे रेल्वे स्थानकावरकाही वेळ तारांबळ उडाली होती. कोचला लागलेली आग आटोक्यात येईपर्यंत या फलाटावर येणाऱ्या रेल्वे गाड्या दुसऱ्या फलाटावर वळविण्यात आल्या होत्या. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवीत हानी झाली नाही. या घटनेमुळे काही हावडाकडून मुंबईकडे जाणाऱ्या
काही वेळ आऊटवर थांबविण्यात आल्या होत्या. आग पुर्णपणे आटोक्यात आल्यानंतर काही वेळातच रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली.
शार्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाजगोंदिया रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर उभ्या असलेल्या अपघात मदत वैद्यकीय व्हॅनच्या कोचला शार्ट सर्कीटमुळे आग लागून
या आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण केल्याने कोचमधील संपूर्ण सीट जळून राख झाल्याचे बोलल्या जाते. तर वैद्यकीय मदतीसाठी ठेवलेल्या सामानाचे सुध्दा नुकसान झाल्याची माहिती आहे.
तर घडला असता माेठा अनर्थअपघात मदत वैद्यकीय व्हॅनमध्ये वैद्यकीय उपचाराचे साहित्य, ऑक्सिजन सिलिंडर, गॅसबत्ती व इतर मदतीचे साहित्य ठेवले होते. कोचला लागलेली आग वेळीच आटोक्यात आली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांना सुध्दा याची झळ बसली असती.