त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By Admin | Updated: August 26, 2014 23:35 IST2014-08-26T23:35:35+5:302014-08-26T23:35:35+5:30
हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येरंडी येथे ही घटना घडली आहे. मृत विवाहितेचे नाव मनीषा

त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
गोंदिया : हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येरंडी येथे ही घटना घडली आहे. मृत विवाहितेचे नाव मनीषा अरविंद गेडाम (२४, रा.येरंडी/देव.) असे आहे.
प्रकरणात, आरोपी अरविंद सदाराम गेडाम (३५), पंचशीला सदाराम गेडाम, सदाराम गेडाम (रा.येरंडी/देव.), रंजाना रामटेके (रा. खांबी/पिंपळगाव) हे मृत मनिषा गेडाम हिला माहेरून ३० हजार रूपये आण अशी मागणी करून तिचा शारिरीक व मानसिक छळ करीत होते. पैशांसाठी ते मनिषाला मारहाण सुद्धा करीत असल्याने सततच्या त्रासाला कंटाळून तिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या. फिर्यादी इंदिरा खुशाल ठवरे (४५, रा.बोंडगावदेवी) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भांदविच्या कलम ३०४ (ब), ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. (शहर प्रतिनिधी)