सासरच्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या
By Admin | Updated: November 29, 2015 02:39 IST2015-11-29T02:39:18+5:302015-11-29T02:39:18+5:30
गोरेगाव तालुक्यातील गिधाडी येथील एका विवाहितेला मूल होत नसल्याने सासरच्या लोकांनी तिचा छळ केला.

सासरच्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील गिधाडी येथील एका विवाहितेला मूल होत नसल्याने सासरच्या लोकांनी तिचा छळ केला. वारंवार वडिलांकडून पैसे आण अशी मागणी केली. या छळाला कंटाळून त्या विवाहितेने गळफास घेऊन गुरुवारी सकाळी ९ वाजता आत्महत्या केली. याबाबतची तक्रार मुलीच्या आईने दिल्यामुळे पती व सासूविरुद्ध गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिनाक्षी आशिष टेंभुर्णेकर (२८) रा. गिधाडी असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. मूल होत नाही म्हणून तिची सासू व पती तिला टोमने द्यायचे. माहेरुन पैसे आण म्हणून वारंवार त्रास द्यायचे. या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली. या प्रकरणात पती आशिष जीवनलाल टेंभुर्णेकर (३३) सासू इमला जिवनलाल टेंभुर्णेकर (६५) या माय-लेकांवर भादंविच्या कलम ४९८ (अ) ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.