धावत्या रेल्वेतून विवाहिता गायब

By Admin | Updated: January 13, 2016 02:18 IST2016-01-13T02:18:18+5:302016-01-13T02:18:18+5:30

ओरिसा येथे आपल्या सासरी जाण्यास निघालेली विवाहित महिला धावत्या रेल्वेतून गायब झाली.

Marriage disappeared from the running train | धावत्या रेल्वेतून विवाहिता गायब

धावत्या रेल्वेतून विवाहिता गायब

गोंदियाचे माहेर : ओरिसात जात होती
गोंदिया : ओरिसा येथे आपल्या सासरी जाण्यास निघालेली विवाहित महिला धावत्या रेल्वेतून गायब झाली. या विवाहित महिलेचे नाव प्रियंका केशवदास (२७) असून ती गोंदियावरून भुवनेश्वरला जात होती. ही घटना १० जानेवारी २०१६ रोजी घडली.
सदर महिला काही दिवसांसाठी गोंदिया येथे आपल्या माहेरी रामनगर येथे आली होती. यानंतर ती गोंदिया स्थानकातून जोधपूर-पूरी एक्सप्रेसच्या (१८४७४) कोच एस ८ मधील बर्थ-५२ वर बसून भुवनेश्वरला आपल्या पतीच्या घरी जात होती. भुवनेश्वरच्या सत्यकाली बस्ती, काली मंदिरजवळ तिचे सासर आहे.
ती ज्या गाडीने जात होती, त्याची माहिती तिने सासरच्या मंडळीस दिली होती. तिला घेण्यासाठी भुवनेश्वरच्या रेल्वे स्थानकात तिच्या सासरचे लोक आले होते. मात्र ती न आढळल्याने त्यांनी रेल्वे स्थानक व सदर रेल्वे गाडीच्या सर्व बोग्यांमध्ये शोध घेतला. मात्र प्रियंका कुठेच आढळली नाही.
सदर महिलेचे लग्न सात वर्षांपूर्वी झाले असून तिला मुलबाळ नसल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
या प्रकाराची माहिती गोंदिया रेल्वे पोलिसांना देण्यात आली आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अशोक यादव करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Marriage disappeared from the running train