इज्तेमाई शादीत २२ जोडप्यांचा निकाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 01:17 AM2019-02-13T01:17:58+5:302019-02-13T01:18:29+5:30

येथील मुस्लीम मायनॉरिटी ट्रस्टच्यावतीने आयोजित इज्तेमाई शादीत मुस्लीम समाजातील २२ जोडप्यांचा निकाह लावण्यात आला. रविवारी (दि.१०) मुस्लीम समाजाच्या शादीखाना येथे पार पडलेल्या या सोहळ््यात गुणवंत विद्यार्थी तसेच विशेष कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

The marriage of 22 couples in Ijtai married | इज्तेमाई शादीत २२ जोडप्यांचा निकाह

इज्तेमाई शादीत २२ जोडप्यांचा निकाह

Next
ठळक मुद्देमुस्लीम मायनॉरिटी ट्रस्टचा उपक्रम : ५ हजाराहून अधिक बांधवांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील मुस्लीम मायनॉरिटी ट्रस्टच्यावतीने आयोजित इज्तेमाई शादीत मुस्लीम समाजातील २२ जोडप्यांचा निकाह लावण्यात आला. रविवारी (दि.१०) मुस्लीम समाजाच्या शादीखाना येथे पार पडलेल्या या सोहळ््यात गुणवंत विद्यार्थी तसेच विशेष कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या इज्तेमाई शादीला अजमेर येथून आलेले जैयनुमआबेदीन अलीखा, पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार परिणय फुके, नगराध्यक्ष अशोक इंगळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, उपाध्यक्ष शिव शर्मा, माजी उपाध्यक्ष गप्पू गुप्ता, माजी सभापती घनशाम पानतवने, तारीक कुरेशी, जमाल सिद्धीकी, सय्यद असलम अली, इरशाद अहमद कुरेशी, विमल मानकर, शकील मंसूरी, जितेंद्र पचंबुद्धे प्रामुख्याने उपस्थित होते. या इज्तेमाई शादी सोहळ््यात मुस्लीम समाजातील २२ जोडप्यांचा मुस्लीम विवाह पद्धतीने निकाह लावण्यात आला.
विशेष म्हणजे, या विवाह सोहळ््यात भंडारा, गोंदिया तसेच लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील समाजबांधव सहभागी झाले होते. तसेच सोहळ््यात सहभागी ५ हजार बांधवांचा प्रत्येकी १ लाख रूपयांचा विमा काढण्यात आला होता.
विशेष म्हणजे, याप्रसंगी पालकमंत्री बडोले व आमदार फुके यांनी मुख्यमंत्र्यांकडून १ कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले. संचालन साजीया खान यांनी केले. आभार ट्रस्टचे अध्यक्ष सय्यद असलम अली यांनी मानले. या सोहळ््यासाठी हाजी गुलाम मोहम्मद, नईम सलाम खान, इत्तेयार खान, इत्तेयार गणिखान, नईम खान, शादाब शेख, मुस्ताक तिगाला, नसीम शेख, शबील कुरेशी, मो.इरफान काजी, मिर्जा तालीब बेग, सय्यद जाकीर अली, नईम कुरेशी, जहागीर सिद्धीकी यांच्यासह ट्रस्टच्या सदस्यांनी सहकार्य केले.

गुणवंत विद्यार्थी व कार्यकर्त्यांचा सत्कार
या सोहळ््यात समाजातील १० व १२ वीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच बढते कदम सामाजिक संस्थेचे सुनील पृथ्यानी, खासला गु्रपचे वजींद्र सिंह मान, खिदमत ग्रुपचे सय्यद जफरअली, एक पहल ऐसी भी चे कल्लू यादव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निलेश देशभ्रतार, गेम स्पोर्ट करिअरचे मानकर, जकात मल्टी हेल्थ ग्रुपचे सय्यद जाकर अली, विदर्भ विकास परिषदेचे मोनू राठोड यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: The marriage of 22 couples in Ijtai married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न