बाजार समितीची स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल

By Admin | Updated: October 31, 2015 02:39 IST2015-10-31T02:39:04+5:302015-10-31T02:39:04+5:30

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर स्वच्छ रहावे व समितीची उत्तरोत्तर प्रगती व्हावी या उदात्त हेतूने समितीत दर गुरूवारी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

Market Committee will move towards cleanliness from prosperity | बाजार समितीची स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल

बाजार समितीची स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल

श्रमदानातूृन होतोय कायापालट : दुरूस्ती व सौंदर्यीकरणाची विविध कामे
तिरोडा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर स्वच्छ रहावे व समितीची उत्तरोत्तर प्रगती व्हावी या उदात्त हेतूने समितीत दर गुरूवारी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. तसेच अभियानाच्या माध्यमातून बाजार समिती परिसरात स्वच्छतेसह किरकोळ दुरूस्तीसह नाली बांधकाम व सौंदर्यीकरणाची कामे केली जात आहेत.
समितीचे मुख्य प्रशासक डॉ. चिंतामन रहांगडाले, प्रशासक डॉ. वसंत भगत, संजयसिंह बैस तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाजार समितीच्या स्वच्छतेसाठी कंबर कसली आहे. २ आॅक्टोबर रोजी स्वच्छता अभियानाचे उद्घाटन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. आतापर्यंत स्वच्छतेकडे लक्ष देऊन किरकोळ दुरुस्ती, नवीन नाली निर्मिती व सौंदर्यीकरणाची काही कामे पूर्ण झाली असून काही कामे सुरू आहेत.
ही सर्व कामे श्रमदानातून होत असल्याने समितीचा कोणताही खर्च होत नाही. पैशांची बचत होऊन समितीची वाटचाल समृद्धीकडे होत आहे. यासाठी समितीचे प्रभारी सचिव राघवेंद्रसिंह बैस, लेखापाल कार्तिक बिसेन, निरीक्षक चंद्रकांत चव्हाण, लिपीक कुलदीप शुक्ला, तेंद्रलता ठाकरे, राधेशाम मडावी, अशोक रहांगडाले, प्यारकुमार खोब्रागडे, अनिता नंदेश्वर, कैलास कटरे, राजकुमार उके, छोटू पटले, अनिल पटले, पुरुषोत्तम बघेले सहकार्य करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Market Committee will move towards cleanliness from prosperity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.