बाजार समिती राष्ट्रवादीच्या हातात

By Admin | Updated: September 15, 2015 04:19 IST2015-09-15T04:19:33+5:302015-09-15T04:19:33+5:30

सडक-अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत पटकावल्यानंतर सोमवारी (दि.१४)

Market Committee in the hands of the NCP | बाजार समिती राष्ट्रवादीच्या हातात

बाजार समिती राष्ट्रवादीच्या हातात

सडक अर्जुनी : सडक-अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत पटकावल्यानंतर सोमवारी (दि.१४) झालेल्या सभापती-उपसभापतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे डॉ. अविनाश काशिवार यांची सभापती म्हणून तर आनंद अग्रवाल यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली.
दुपारी १.३० वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. राष्ट्रवादीकडून डॉ.अविनाश काशिवार यांनी तर उपसभापतीपदासाठी आनंद अग्रवाल यांनी नामांकन दाखल केले. भाजपा-काँग्रेस युतीचे सभापतीपदासाठी वसंत गहाणे तर उपसभापतीपदासाठी आणि निताराम देशमुख यांनी नामांकन दाखल केले.
१९ सदस्य असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ११ सदस्य राष्ट्रवादीच्या हातात होते. त्यापैकी एक सदस्य निवडणूक प्रक्रियेत भाग घेणार नव्हता. त्यामुळे १० सदस्य राष्ट्रवादीजवळ होते. त्यापैकी एक सदस्य मुन्ना अग्रवाल अपक्ष म्हणून निवडून आल्याने ते राष्ट्रवादीच्या गटात सामील होते. काँग्रेस-भाजप गटाचे ८ सदस्य निवडून आले होते. सभापतीपदासाठी डॉ. अविनाश काशिवार यांना ११ मते तर वसंत गहाणे यांना ७ मते पडली. तसेच उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे आनंद अग्रवाल यांना १० तर काँग्रेस-भाजप समर्थित मिताराम देशमुख यांना ८ मते मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीने आपला गड कायम कायम ठेवला.
या निवडणुकीच्या वेळी राकाँचे जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, जि.प. सदस्य रमेश चुऱ्हे, जि.प.सदस्य मिलन राऊत तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आ.राजेंद्र जैन यांची त्यांनी भेट घेतली. राकाँ नेते खा.प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Market Committee in the hands of the NCP