गृहबांधणी व्यवसायातून अनेकांना रोजगार

By Admin | Updated: June 3, 2015 01:20 IST2015-06-03T01:20:38+5:302015-06-03T01:20:38+5:30

जिल्ह्यात व शहरात कोणताही मोठा उद्योग नसल्याने येथील युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.

Many people employed from house building business | गृहबांधणी व्यवसायातून अनेकांना रोजगार

गृहबांधणी व्यवसायातून अनेकांना रोजगार

गोंदिया : जिल्ह्यात व शहरात कोणताही मोठा उद्योग नसल्याने येथील युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. मात्र गोंदिया शहरात गृहबांधणी उद्योग मोठयÞा प्रमाणात विस्तारला असल्याने यातून हजारो युवक व नागरिकांना रोजगाराचे साधन प्राप्त झाले आहे.
जिल्हा निर्मितीला १६ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी एकही मोठा उद्योग या जिल्ह्यात अजूनपर्यंत स्थापन झाला नाही. परिणामी रोजगाराची मोठी समस्या या जिल्ह्यात निर्माण झाली आहे. इतर सर्व उद्योग मागे पडले असले तरी गोंदिया शहरात मात्र मागील काही वर्षांपासून गृहबांधणी उद्योग जोरात सुरू आहे. अनेक नागरिक व कर्मचाऱ्यांना जिल्हा स्थळ व शहराचे विशेष आकर्षण असल्याने गावाकडील शेतजमीन, घरदार विकून शहरात राहण्यास पसंती दर्शवितात. यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येते. गोंदिया जिल्ह्यात शासकीय नोकरीवर असलेला व्यक्ती गोंदिया येथे स्थायिक होण्यास विशेष पसंती दर्शविते. परिणामी गोंदिया शहराची लोकसंख्या मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत चालली आहे. त्या तुलनेत शहराच्या विस्तारावर मर्यादा असल्याने घराची जागा मिळणे कठीण झाले आहे. याचा गैरफायदा उचलत प्लॉट विक्र ेत्यांनी भूखंडांच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढविल्या आहेत. येथील प्लॉटची किंमती नागपूर एवढयÞा आहेत. यातून प्लॉट विक्र ेते गब्बर बनत आहेत. गृहबांधणीच्या कामामुळे रोजगाराची संधी उपलब्ध झाल्या आहेत.

Web Title: Many people employed from house building business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.