श्रमिक पत्रकार संघाकडून अनेकांचा सत्कार

By Admin | Updated: March 21, 2017 01:01 IST2017-03-21T01:01:56+5:302017-03-21T01:01:56+5:30

जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या स्थापना दिवसी गुरूनानक सभागृहात दि.१८ ला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

Many felices from the labor journalist team | श्रमिक पत्रकार संघाकडून अनेकांचा सत्कार

श्रमिक पत्रकार संघाकडून अनेकांचा सत्कार

गोंदिया : जिल्हा श्रमिक पत्रकार संघाच्या स्थापना दिवसी गुरूनानक सभागृहात दि.१८ ला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अतिथी उद्योगपती हितेश सतीश बग्गा व डॉ. विकास जैन यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, उपविभागीय अधिकारी वालस्कर, पोलीस अधिकारी दिनेश शुक्ला यांचा मागील निवडणुकीत उत्कृष्ट संचालन केल्याबद्दल शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करणयात आला. या वेळी प्रशस्तीपत्र रोख रक्कम पाच हजार रूपये जिल्ह्यातील विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविणाऱ्या व्यक्तींना स्व. सतीश बग्गा स्मृती युवा जागृती गोंदिया जिल्हा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिमन्य काळे, डॉ. विकास जैन, हितेश बग्गा यांच्या हस्ते भूषण पुरस्कार खेळकूद क्षेत्रात अब्दुल वहाब सय्यद, शिक्षण क्षेत्रात गेंदलाल कटारे, कला क्षेत्रात रितेश अग्रवाल (आमगाव), कृषी क्षेत्रात राणू रहांगडाले, समाजसेवा क्षेत्रात हर्ष मोदी (सौंदड) यांना देण्यात आले.
अतिथींचे स्वागत अध्यक्ष गोपाल अग्रवाल, सचिव राजेश बन्सोड, सुब्रत पाल, प्रकाश धोटे, प्रकाश तिडके यांनी केले. संचालन प्रमोद सचदेव यांनी केले. यावेळी मुंबईचे डी. महेश यांनी आपल्या मिमिक्री कॉमेडीद्वारे व इंदोर येथील पूजा पालीवाल यानी नवीन व जुन्या गीतांद्वारे दर्शकांचे मनोरंजन केले. (प्रतिनिधी)

Web Title: Many felices from the labor journalist team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.