तिरोडा परिसरात अनेक सोयीसुविधा

By Admin | Updated: February 20, 2015 01:24 IST2015-02-20T01:24:28+5:302015-02-20T01:24:28+5:30

तिरोडा येथील अदानी विद्युत प्रकल्पालगतच्या अनेक गावांमध्ये अदानी फाऊंडेशनने विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

Many amenities in Tiroda area | तिरोडा परिसरात अनेक सोयीसुविधा

तिरोडा परिसरात अनेक सोयीसुविधा

सुकडी-डाकराम : तिरोडा येथील अदानी विद्युत प्रकल्पालगतच्या अनेक गावांमध्ये अदानी फाऊंडेशनने विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यापूर्वी गावात कधीही उपलब्ध नसलेल्या सोयी मिळाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
या प्रकल्पामुळे गावात सौर उर्जेचे दिवे तसेच चावडीवर बसणाऱ्यांना सिमेटच्या खुर्च्या व बेंच मिळाले. अदानी प्रकल्प सुरू झाल्यामुळे सभोवतालच्या गावांना त्याचा फायदाच होत असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटी क्रिडा सेलचे अध्यक्ष प्रा.विलास मेश्राम यांनी सांगितले. मजुरांना मोठ्या प्रमाणात मजुरीकरीता वनवन करावी लागत होती. आता त्या मजुरांच्या हाताला काम मिळाले. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढून शेतकऱ्यांच्या फायदा झाला. तिरोडा बाजारपेठेच्या दृष्टीने आवक वाढली तर विविध गावांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमाला त्याची मदत झाली.
बऱ्याच गावात सौर दिवे बसवून देण्यात आले. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून गावागावात बोरवेल तयार करून देण्याचे काम हाती घेतले आहे. सुकडी-डाकराम येथे दोन बोअरवेल खोदून दिल्या. आलेझरी-बालापूर या गावात दोन बोअरवेल दिल्या.
यामुळे सामान्य माणसाला पाण्याची सोय व्हावी हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन बरेच उपक्रम राबवित आहे. मग शेतकऱ्यांना, बेरोजगाराना काम मिळाले पाहिजे त्यासाठी प्रशिक्षण दिल्या जात आहे. अशा विविध सोयी विविध परिसरातील गावात राबवित असल्याचे दिसून येते. यामुळे अदानी विद्युत प्रकल्प गावागावात एक प्रकारे वरदानच ठरत आहे. (वार्ताहर)

Web Title: Many amenities in Tiroda area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.