मनुस्मृती दहन दिन साजरा
By Admin | Updated: December 28, 2016 02:43 IST2016-12-28T02:43:41+5:302016-12-28T02:43:41+5:30
समता सैनिक दलाच्या वतीने सडक-अर्जुनी तालुक्यातील पळसगाव-डव्वा येथील धम्मकुटीत दोन दिवसीय धम्मसंमेलन घेण्यात आले.

मनुस्मृती दहन दिन साजरा
गोंदिया : समता सैनिक दलाच्या वतीने सडक-अर्जुनी तालुक्यातील पळसगाव-डव्वा येथील धम्मकुटीत दोन दिवसीय धम्मसंमेलन घेण्यात आले. याप्रसंगी मनुस्मृती दहन दिवस साजरा करण्यात आला.
समाजाच्या सुरक्षेसहच स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यांचे संरक्षण करणे हे समता सैनिक दलाचे उद्देश्य आहे. या उद्देशाची पूर्ती व जनचेतना निर्माण करण्यासाठी भदंत संघधातू व भिक्षू संघाद्वारे रविवार (दि.२५) सकाळी रॅली काढण्यात आली. यात ३०० सैनिकांचा लाँग मार्च निघाला. रॅलीचे नेतृत्व डॉ. अजय अंबादे, अनिता जांभूळकर, प्रा. के.एम. भैसारे यांनी केले.
दुपारी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे आगमन धम्मकुटीत झाले. तेथे त्यांनी दान दिलेल्या थाईलँड येथील बुद्धमूर्तीचे लोकार्पण भदंत संघधातू यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण करण्यात आले. तसेन ना. बडोले यांनी धम्मकुटी डव्वाच्या विकासासाठी ५० लाख रूपये देण्याची घोषणा केली. भिक्षू संघ व समता सैनिक दलाद्वारे त्यांचा शाल देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अमित संबोधी, के.एम. भैसारे, बाबुलाल इलमकर, अनिता जांभूळकर, निशा तागडे, आसाराम वैद्य, सांगोळकर व दलाचे सैनिक उपस्थित होते.
यानंतर मनुष्य जातीच्या उत्कर्षाला हानीकारक, स्त्रियांच्या विकासात बाधक व बहुजन समाजाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या मनुस्मृतीची प्रत जाळण्यात आली व मनुस्मृती दहन दिन साजरा करण्यात आला. या वेळी सडक-अर्जुनी, गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, अर्जुनी-मोरगाव, आमगाव, सालेकसा, देवरी तालुक्यातील समता सैनिक दलाचे ३०० सैनिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)