मंसुरी व तिवारी यांचा अग्रवाल यांनी केला सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:33 IST2018-02-17T23:33:24+5:302018-02-17T23:33:38+5:30
नगर परिषदेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या तोंडचा घास पळवित बांधकाम समिती सभापती निवडून आलेले शकील मंसूरी व स्थायी समितीत सदस्य म्हणून गेलेले सुनील तिवारी यांची आमदार गोपालदास अग्रवाल यांची भेट घेतली.

मंसुरी व तिवारी यांचा अग्रवाल यांनी केला सत्कार
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : नगर परिषदेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या तोंडचा घास पळवित बांधकाम समिती सभापती निवडून आलेले शकील मंसूरी व स्थायी समितीत सदस्य म्हणून गेलेले सुनील तिवारी यांची आमदार गोपालदास अग्रवाल यांची भेट घेतली. यावेळी अग्रवाल यांनी दोघांचा सत्कार केला.
नगर परिषद सभापती निवडणुकीला घेऊन उत्सुकतेचे वातावरण असताना राजकीय कौशल्याचा वापर करून सत्ताधाºयांच्या चारही मुंड्या चीत करीत कॉंग्रेसचे मंसूरी बांधकाम समिती सभापतीपदी ईश्वरीचिठ्ठीने निवडून आले. तर सुनील तिवारी स्थायी समिती सदस्य म्हणून निवडले गेले. यामुळे कॉंग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. विशेष म्हणजे, पाणी पुरवठा सभापतीपदासाठी ईश्वरीचिठ्ठीत क्रांती जायस्वाल पराजीत झाले. अन्यथा नगर परिषदेतील दोन सभापतीपद कॉंग्रेसने काबीज केले असते.
निवड झाल्यावर मंसूरी आणि तिवारी यांनी आमदार अग्रवाल यांची जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली.
याप्रसंगी अपूर्व अग्रवाल, संदीप ठाकूर, आलोक मोहंती, दिपल अग्रवाल, दीपक मालगुजार, देवा रूसे, मंटू पुरोहीत, योगराज उपराडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.