मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रम आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 20:33 IST2018-02-08T20:33:20+5:302018-02-08T20:33:34+5:30
शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११२ व्या जयंती निमित्त सुर्वणपदक वितरण सोहळा शुक्रवारी (दि.९) दुपारी १२ वाजता येथील डी. बी. सायन्स कॉलेजच्या प्रांगणावर आयोजित केला आहे.

मनोहरभाई पटेल जयंती कार्यक्रम आज
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११२ व्या जयंती निमित्त सुर्वणपदक वितरण सोहळा शुक्रवारी (दि.९) दुपारी १२ वाजता येथील डी. बी. सायन्स कॉलेजच्या प्रांगणावर आयोजित केला आहे.
खा. प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, खा. डिंपल यादव, खा.नरेश अग्रवाल, आ. अबु आझमी, सिने अभिनेत्री रविना टंडन, प्रसिध्द गायक सोनू निगम, हास्य कलावंत राजू श्रीवास्तव, माजी मंत्री अनिल देशमुख, आ. गोपालदास अग्रवाल, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, विलास श्रृंगारपवार, नाना पंचबुध्दे, माजी. आ. अनिल बावणकर, रामरतन राऊत, दिलीप बन्सोड, सेवक वाघाये, मधुकर कुुकडे, विजय शिवणकर,नरेश माहेश्वरी उपस्थित राहतील. या वेळी गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शालांत आणि पदव्युत्तर परीक्षेत सर्वाधिक गुण घेवून उर्तीण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्ण पदक देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तसेच प्रगतशिल शेतकºयांचा सत्कार करण्यात येणार आहे. यादरम्यान कार्यक्रमस्थळालगत कृषी प्रदर्शनीचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे असे, मनोहरभाई पटेल अकॅडमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल, सचिव माजी आ.राजेंद्र जैन यांनी कळविले आहे.