मनोहरभाई पटेल जयंती समारोह आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:32 IST2021-02-09T04:32:07+5:302021-02-09T04:32:07+5:30
गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता स्थानिक नमाद महाविद्यालयाच्या ...

मनोहरभाई पटेल जयंती समारोह आज
गोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता स्थानिक नमाद महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या वेळी दोन्ही जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. प्रफुल्ल पटेल राहणार असून यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मनोहरभाई पटेल स्मृती समिती, श्री गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ, मनोहरभाई पटेल अकॅडमी, गोंदिया शिक्षण संस्थेच्या वर्षा पटेल, माजी आमदार हरिहरभाई पटेल, माजी आ. राजेंद्र जैन यांनी केले आहे.