मनोहरभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:46 IST2021-02-05T07:46:12+5:302021-02-05T07:46:12+5:30
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.आर.यृू.गायकवाड, डॉ. उमावती पवार, डॉ. गोपाल हलमारे, डॉ.बी.के.जैन, डॉ. नामदेव हटवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात नेताजी ...

मनोहरभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.आर.यृू.गायकवाड, डॉ. उमावती पवार, डॉ. गोपाल हलमारे, डॉ.बी.के.जैन, डॉ. नामदेव हटवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या छायाचित्राचे पूजन करण्यात आले . यावेळी डॉ. जिवानी यांनी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्यापासून सर्वांनी प्रेरणा घेऊन त्यांचे कार्य पुढे नेण्याचे काम नवीन भारत निर्माण करण्यासाठी करावे असे विचार व्यक्त केले. इतिहास विभाग प्रमुख डॉ. हटवार यांनी, सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. इंग्रजासोबत आझाद हिंद सेेनेच्या साहाय्याने त्यांनी युद्ध पुकारले व शेवटपर्यंत लढले. आझाद हिंद सेनेचे सरकार बनविली. मंत्रिमंडळ तयार केले, नोटाही छापल्या अशी माहिती त्यांनी दिली.
प्रास्ताविक प्रा. हटवार यांनी मांडले. संचालन प्रा.अश्विन खांडेकर यांनी केले. आभार डॉ .बी.जे.राठोड यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा.भगवान साखरे, डॉ.बी.टी.फुंडे, डॉ. दीप्ती चौरागडे, प्रा.परिमल डोंगरे, प्रा.वाय.आर.जोगी, ग्रंथपाल अरविंद भगत, प्रा.मनोहर वाघेरे, नामदेव बागडे यांनी सहकार्य केले.