मंगेश शिंदे गोंदियाचे नवे पोलीस अधीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:11 IST2019-07-15T22:11:17+5:302019-07-15T22:11:31+5:30
गोंदिया येथील पोलीस अधीक्षक विनीता साहू यांची नवीन मुंबई पोलीस उपायुक्त मुख्यालय येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी पुणे शहर पोलीस उपायुक्त परिमंडल ३ येथील मंगेश पोपटराव शिंदे यांची गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मंगेश शिंदे गोंदियाचे नवे पोलीस अधीक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया येथील पोलीस अधीक्षक विनीता साहू यांची नवीन मुंबई पोलीस उपायुक्त मुख्यालय येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी पुणे शहर पोलीस उपायुक्त परिमंडल ३ येथील मंगेश पोपटराव शिंदे यांची गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी विनीता साहू यांची भंडाऱ्यावरुन गोंदियाचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली होती. परंतु अवघ्या पाच महिन्यातच त्यांची बदली मुंबई येथे झाली. सोबतच वर्धा येथील अप्पर पोलीस अधीक्षक निखिल एन.पिंगळे यांची गोंदिया अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.