शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

बनावट शिक्षक भरती प्रकरणात एकाला अटक

By admin | Updated: May 6, 2015 01:03 IST

राज्यातील ग्राम पंचायतींना मधात पाडून त्यांच्या माध्यमातून शिक्षक भरतीच्या नावावर कोट्यवधींची माया ...

आमगाव : राज्यातील ग्राम पंचायतींना मधात पाडून त्यांच्या माध्यमातून शिक्षक भरतीच्या नावावर कोट्यवधींची माया जमवून पसार होण्याच्या तयार असलेल्या मुंबई येथील एज्युकेशनल सर्वीसेस या संस्थेचा डाव उधळण्यात आमगाव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या भरती प्रकरणात एकाला अटक केली आहे. तर ही एक मोठी टोळी असल्याचा संशय असून या पूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. ने शासनाची शिक्षक भरती असल्याचे भासवून राज्यातील संपूर्ण ग्रामपंचायतींच्या माध्यमातून उमेदवारांकडून अर्ज मागीतले होते. परंतु सदर भरती बनावट असल्याची माहिती होताच येथील काही उमेदवारांनी या संस्थेविरूध्द तक्रार नोंद केली होती. या बनावट भरती प्रकरणातील एका आरोपीला पकडण्यात आमगाव पोलिसांनी यश आले आहे. एज्युकेशनल सर्वीसेस या संस्थेने सर्व शिक्षा सेवा विस्तार अंतर्गत राज्यात सुशिक्षीत बेरोजगारांकडून शिक्षक भरतीची जाहिरात इंटरनेटच्या माध्यमातून प्रकाशित केली होती. तर आरोपींनी सदर भरती प्रक्रियेत अधिकाधिक उमेदवारांनी सहभागी व्हावे यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त बारावी उत्तीर्ण मागविली होती. तसेच आवेदनाचा अंतिम दिनांक ३० एप्रिलपर्यंत दाखविण्यात आला होता. परंतु या भरती संदर्भात आमगाव येथील काही उमेदवारांना शंका बळावल्यामुळे त्यांनी सदर भरती संदर्भात शासनाच्या विविध विभागांकडून शहानिशा केली. यासंबंधात शासनाकडून अशाप्रकारे कोणतीच नोकर भरती नसल्याची माहिती पुढे आली. तर शासनाच्या राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कडून सदर जाहिरातीशी विभागाचे कोणतेच संबध नसल्याचे प्रसिध्द पत्रक काढण्यात आले. त्यामुळे उमेदवारांना स्वत:ची फसवणूक झाल्याची जाण झाली. त्यांनी या संदर्भात आमगाव पोलिसांत ३० एप्रिल रोजी तक्रार दिली असता त्याआधारे भादंवी ४२०,४१९ प्रमाणे सदर संस्थेविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस विभागाने उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बी.डी.मडावी यांच्यासह पथक मुंबईला पाठविले. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपासाकरिता मुंबई येथे पथक पाठविण्यात आल्याचे पोलीस सुत्रांनी सांगीतले. (शहर प्रतिनिधी)