ममता जैन ठरल्या ‘उडान क्वीन’
By Admin | Updated: July 20, 2015 01:25 IST2015-07-20T01:25:01+5:302015-07-20T01:25:01+5:30
जेसीआय झारसुकडा संस्कृतीद्वारे दोन दिवसीय महिला प्रशिक्षण शिबिर पार पडले. यात शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमतेच्या मापदंडावर यशस्वी झाल्यावर ...

ममता जैन ठरल्या ‘उडान क्वीन’
गोंदिया : जेसीआय झारसुकडा संस्कृतीद्वारे दोन दिवसीय महिला प्रशिक्षण शिबिर पार पडले. यात शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमतेच्या मापदंडावर यशस्वी झाल्यावर उत्कृष्ट सहभागी पुरस्कार म्हणून यावर्षीचा ‘उडान क्वीन’ पुरस्कार गोंदियाच्या ममता सुनील जैन यांना मिळाला.
अध्यक्षस्थानी धर्मिष्ठा सेंगर होत्या. या वेळी प्रामुख्याने राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. वेदुला रामालक्ष्मी, सहायक प्रशिक्षक मिनाक्षी कुलकर्णी व लवली सिंग उपस्थित होते. शिबिरात महिलांना त्यांच्यातील सुप्त गुण व प्रतिभा समजावून कुटूंब, समाज व देशासाठी त्यांची भूमिका व त्यांच्यातील नेतृत्व क्षमता विकसित करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले. ममता जैन यांच्या यशाबद्दल पुरूषोत्तम मोदी, महेश ठकराणी, नगरसेवक श्रद्धा अग्रवाल, आनंद छितरका, गगन छितरका, अजय दादरीवाल, कश्मिरा संघानी, कृतिका सेठ, प्रज्ञा मेहता, शिखा भोगलकर, तन्वी श्रीरामे यांनी कौतुक केले.