शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

प्रसूतीसाठी मोेजले जातात पैसे

By admin | Updated: February 1, 2015 22:59 IST

बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी परिचारिकांचा हैदोस वाढला आहे. येथे प्रसूतीकरिता आलेल्या महिलांकडून पैसे घेतले जातात, अशी चर्चा आहे. तसेच रुग्णालय परिसरात कर्मचारी

शासकीय वसाहतीचा दुरूपयोग : बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात अनागोंदी कारभार आमगाव : बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी परिचारिकांचा हैदोस वाढला आहे. येथे प्रसूतीकरिता आलेल्या महिलांकडून पैसे घेतले जातात, अशी चर्चा आहे. तसेच रुग्णालय परिसरात कर्मचारी वसाहत तयार केली आहे. तेथे ज्याला राहण्याकरिता दिले तो न राहता त्याने कंत्राटी परिचारिकेला भाड्याने दिले आहे. एकंदरीत बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात अनागोंदी कारभार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांना या अनागोंदी कारभाराची कसलीही माहिती नसल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रुग्णालयात कार्यरत साफसफाई करणाऱ्या महिला प्रसूतीकरिता रुग्णालयात आलेल्या महिलांकडून हजार ते १२०० रुपये वसूल करतात. उद्देश प्रसूतीकरिता येणाऱ्या महिलेची सेवा उत्कृष्ट करणे व रुग्णाची काळजी घेणे, असा हा कार्यक्रम आहे. पण ज्या महिला प्रसूतीकरिता रुग्णालयात येतात, त्या गरीब आहेत. त्यांची क्षमता पैसे देण्याची नाही किंवा मागणी नंतर पैसे देऊ शकत नाही. त्या महिलांना काही तरी संदर्भ सांगून त्यांना गोंदिया येथे प्रसूतीकरिता पाठविले जाते. अशावेळी आमगाव गोंदिया मार्गाने एखाद्या गरोदर महिलेस नेत असताना विपरीत घटना घडली तरी वैद्यकीय अधिकारी किंवा परिचारिका यांच्यावर कोणी ठपका ठेऊ शकत नाही. केवळ पैसे दिले जात नाही, यासाठी गरोदर महिलांना त्रास दिला जात आहे. यात पैसे वसूल करण्याचे काम चपराशी महिला करते व ते पैसे कंत्राटी परिचारिकेला दिले जातात. तसेच याच रुग्णालयातील परिसरात कर्मचारी वसाहत तयार केली आहे. तेथे औषध निर्माण अधिकारी यांचे वास्तव्य असलेली जे क्वॉर्टर आहे, तेथे कंत्राटी परिचारिकेला ते क्वॉर्टर भाड्याने दिले असल्याची चर्चा आहे. एकंदरीत प्राथमिक आरोग्य केंद्रात काही महिला कर्मचारी नेतेगिरी करून आपले वर्चस्व सिध्द करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे. तसेच संघटनेचे नाव सांगून काहींनी या रुग्णालयात दुकानदारी सुरू केल्याचे अनेकांनी सांगितले. एवढ्या व्यापक प्रमाणात या रुग्णालयात अनागोंदी कारभार असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डोळेझाक का केली किंवा करीत आहेत, याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)