प्रसूतीसाठी मोेजले जातात पैसे
By Admin | Updated: February 1, 2015 22:59 IST2015-02-01T22:59:06+5:302015-02-01T22:59:06+5:30
बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी परिचारिकांचा हैदोस वाढला आहे. येथे प्रसूतीकरिता आलेल्या महिलांकडून पैसे घेतले जातात, अशी चर्चा आहे. तसेच रुग्णालय परिसरात कर्मचारी

प्रसूतीसाठी मोेजले जातात पैसे
शासकीय वसाहतीचा दुरूपयोग : बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात अनागोंदी कारभार
आमगाव : बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी परिचारिकांचा हैदोस वाढला आहे. येथे प्रसूतीकरिता आलेल्या महिलांकडून पैसे घेतले जातात, अशी चर्चा आहे. तसेच रुग्णालय परिसरात कर्मचारी वसाहत तयार केली आहे. तेथे ज्याला राहण्याकरिता दिले तो न राहता त्याने कंत्राटी परिचारिकेला भाड्याने दिले आहे. एकंदरीत बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात अनागोंदी कारभार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र कार्यरत वैद्यकीय अधिकारी यांना या अनागोंदी कारभाराची कसलीही माहिती नसल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रुग्णालयात कार्यरत साफसफाई करणाऱ्या महिला प्रसूतीकरिता रुग्णालयात आलेल्या महिलांकडून हजार ते १२०० रुपये वसूल करतात. उद्देश प्रसूतीकरिता येणाऱ्या महिलेची सेवा उत्कृष्ट करणे व रुग्णाची काळजी घेणे, असा हा कार्यक्रम आहे. पण ज्या महिला प्रसूतीकरिता रुग्णालयात येतात, त्या गरीब आहेत. त्यांची क्षमता पैसे देण्याची नाही किंवा मागणी नंतर पैसे देऊ शकत नाही. त्या महिलांना काही तरी संदर्भ सांगून त्यांना गोंदिया येथे प्रसूतीकरिता पाठविले जाते. अशावेळी आमगाव गोंदिया मार्गाने एखाद्या गरोदर महिलेस नेत असताना विपरीत घटना घडली तरी वैद्यकीय अधिकारी किंवा परिचारिका यांच्यावर कोणी ठपका ठेऊ शकत नाही. केवळ पैसे दिले जात नाही, यासाठी गरोदर महिलांना त्रास दिला जात आहे. यात पैसे वसूल करण्याचे काम चपराशी महिला करते व ते पैसे कंत्राटी परिचारिकेला दिले जातात.
तसेच याच रुग्णालयातील परिसरात कर्मचारी वसाहत तयार केली आहे. तेथे औषध निर्माण अधिकारी यांचे वास्तव्य असलेली जे क्वॉर्टर आहे, तेथे कंत्राटी परिचारिकेला ते क्वॉर्टर भाड्याने दिले असल्याची चर्चा आहे. एकंदरीत प्राथमिक आरोग्य केंद्रात काही महिला कर्मचारी नेतेगिरी करून आपले वर्चस्व सिध्द करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे.
तसेच संघटनेचे नाव सांगून काहींनी या रुग्णालयात दुकानदारी सुरू केल्याचे अनेकांनी सांगितले. एवढ्या व्यापक प्रमाणात या रुग्णालयात अनागोंदी कारभार असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डोळेझाक का केली किंवा करीत आहेत, याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)