जिल्ह्यात घटतेय कुपोषणाचे प्रमाण

By Admin | Updated: May 21, 2016 01:44 IST2016-05-21T01:44:27+5:302016-05-21T01:44:27+5:30

आदिवासी व नक्षलष्दृट्या अतिसंवेदनशील गोंदिया जिल्ह्यात आता कुपोषणाचे प्रमाण कमी होत आहे.

Malnutrition ratio decreasing in the district | जिल्ह्यात घटतेय कुपोषणाचे प्रमाण

जिल्ह्यात घटतेय कुपोषणाचे प्रमाण

सुधारणा दृष्टिपथास : कमी वजनाच्या श्रेणीत ९८८ तर अतितीव्र श्रेणीत १६६ बालके
गोंदिया : आदिवासी व नक्षलष्दृट्या अतिसंवेदनशील गोंदिया जिल्ह्यात आता कुपोषणाचे प्रमाण कमी होत आहे. जिल्ह्यात कमी वजनाच्या श्रेणीत ९८८ बालके असून कुपोषणात बऱ्याच प्रमाणात सुधार झाला आहे. अति तीव्र श्रेणीत १६६ बालके असून त्यातही मोठ्या प्रमाणात स्थिती सुधाारली आहे. बाल मृत्यू, उपजत मृत्यू यांच्यातही सुधारणा झाली आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यात ५ हजार ८१२ बालकांचे वजन कमी आढळले. त्यात १११२ बालक कुपोषणाच्या अतितिव्र्र श्रेणीत आले होते.
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १६६९ आंगणवाड्यातील शुन्य ते पाच वर्षातील ८७ हजार ६४२ बालकांचे एप्रिल महिन्यात सर्वेक्षण करण्यात आले. शुन्य ते सहा वर्षातील एक लाख ३ हजार ४६४ बालकांचा समावेश होता. यातील ० ते ५ वर्षापर्यंत ८६ हजार ६७० मुलांचे वजन करण्यात आले. १६ हजार ७९४ बालकांचे वजन करण्यात आले नाही. यात ८० हजार ८९९ म्हणजे ९३.३४ टक्के बालक सामान्य आढळले. ४ हजार ८२५ म्हणजे ५.५७ टक्के बालक कमी वजनाच्या श्रेणीत तर ९४६ म्हणजे १.०७ बालके अतितिव्र कमी वजनाची आढळली. परंतु मार्च महिन्यात ५ हजार ८१५ म्हणजे ५.७५ टक्के बालक कमी वजनाचे असल्याचे लक्षात आले. १११२ म्हणजे १.१० टक्के बालक अतितिव्र कमी वजनाचे असल्याचे लक्षात आले. सॅम व मॅम श्रेणीत अनुक्रमे ७६ व २९४ बालके आढळले. एप्रिल महिन्यात ही आकडेवारी कमी होऊन अनुक्रमे ७५ व २७१ राहीली. (तालुका प्रतिनिधी)

सालेकसात वाढले कुपोषण
जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्याला सोडून इतर तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण कमी आहे. एप्रिल महिन्यात अर्जुनी मोरगाव येथे १८१, गोंदिया १६७, आमगाव १२५, सालेकसा ११९, सडक अर्जुनी ९९, तिरोडा ९९, गोरेगाव ८६ व देवरीत ७० बालके अतितिव्र श्रेणीत आढळले. परंतु मार्च महिन्यात अर्जुनी मोरगावात २१०, आमगाव १४३, सालेकसा ९८, सडक अर्जुनी १११, गोरेगाव १२०, गोंदिया १९५, तिरोडा १३० व देवरी तालुक्यात १०५ बालक अतितिव्र श्रेणीत आढळले.
कुपोषणाने ६ बालकांचा मृत्यू
कुपोषणच्या सॅम-मॅम श्रेणीत सर्वाधिक कुुपोषित बालके अर्जुनी मोरगाव तालुक्यात ७२ आढळले. सडक अर्जुनी ५८, आमगाव ४४, गोंदिया ४०, गोरेगाव २८, सालेकसा ३०, देवरी ३७ व तिरोडात १४ बालके सॅम-मॅम श्रेणीत आढळले. एप्रिल महिन्यात १ हजार २४९ बालकांनी जन्म घेतला. त्यात तीन दिवसाच्या १२०९ बालकांचे वजन घेण्यात आले. त्यात ५० बालकांचा २५०० ग्रॅम वजन आढळले. छाप उपजत मृत्यू तर ६ बालकांचा कुपोषणाने मृत्यू आहे.

Web Title: Malnutrition ratio decreasing in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.