शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

जिल्ह्यात वाढले कुपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 21:36 IST

कुपोषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाय योजना केल्या जात आहे. मात्र यानंतरही कुपोषणाला प्रतिबंध लावण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जिल्ह्यात ‘वेट फॉर हाईट’ च्या दृष्टीने कुपोषित बालकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

ठळक मुद्दे‘वेट फॉर हाईट’ : कुपोषणात अजून ४२२ बालकांची भर

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कुपोषणाला आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाय योजना केल्या जात आहे. मात्र यानंतरही कुपोषणाला प्रतिबंध लावण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जिल्ह्यात ‘वेट फॉर हाईट’ च्या दृष्टीने कुपोषित बालकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यात अजून ४२२ कुपोषणग्रस्त बालक आढळले.त्यामुळे कुपोषणाची समस्या गंभीर होत असल्याचे चित्र आहे.जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यात १ हजार ७२८ पैकी १ हजार १९६ अंगणवाडी मिनी अंगणवाडींचे शून्य ते ६ वर्ष वयोगटातील एक लाख १५० बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी ९८ हजार ४०९ बालकांचे वजन मोजण्यात आले. यापैकी ९१ हजार ९५५ (९३.४४) बालके सामान्य आढळले. तर ४२२ बालके कमी वजनाच्या श्रेणीत आढळले. ५ हजार ३७१ ( ५.४६ टक्के) वजन कमी असल्याचे आढळले.१०८३ बालके तीव्र कमी वजनाचे आढळले. सॅम श्रेणीत १३९ (०.१४ टक्के) व व मॅम श्रेणीत ६४२ (०.६४) बालके आढळले. जिल्ह्यात ११७ बालके सॅम व ५०८ बालके मॅम श्रेणीत आढळले.मागील वर्षी डिसेंबर महिन्यात सॅम श्रेणीत ७९ व मॅम श्रेणीत २९० होते. जिल्ह्याच्या गोंदिया तालुक्यात सर्वाधिक १९९ सॅम-मॅम चे बालके आढळले. यानंतर सालेकसा तलुक्यात १२६, अर्जुनी-मोरगाव ११५, आमगाव ९०, गोरेगाव ८२, तिरोडा ७८, देवरी ५१ व सडक-अर्जुनी ४० बालके कुपोषित आढळले.सर्वेक्षणात ८ हजार ४३९ गर्भवती व ९ हजार १९५ स्तनपान करणाऱ्या महिलांची तपासणी करण्यात आली. यात ७ हजार ७३० (९१.६०) गर्भवती व ८ हजार ३२२ (९०.५१ टक्के) स्तनपान करणाऱ्या महिला सामान्य आढळल्या. १३८ महिला सॅम, ६४० महिला मॅम श्रेणीत आढळल्या. १५ महिला गंभीर स्थितीत आढळल्या. १९३ गंभीर आजाराच्या महिला आढळल्या.८३३ बालके आढळले आजारीआरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ७१ हजार १६३ बालकांची तपासणी करण्यात आली. यातील ६६ हजार ३२२ सामान्य आढळले. ८३३ बालकांना विविध आजाराने ग्रस्त आढळले. यातील २३० बालकांना ताप, ११० बालकांना हगवण, ५८ बालकांना चर्मरोग, २८ बालकांना निमोनिया, ३ बालकांना हद्यरोग, ३७ बालकांना दंतरोग, ३१ बालकांना कृमीरोग व ३ बालकांना कानाचा आजार असल्याचे पुढे आले.वजन आणि उंचीवरुन ओळखआईसीडीएसच्या सर्वेक्षणानुसार बालकांची यादी प्रकाशित केली जात आहे. या यादीनुसार न्यूट्रेशिन रिहबेट सेंटर (एनआरसी) व चाईल्ट ट्रीटमेंट सेंटर (सीटीआर) व गाव पातळीवर व्हीसीडीसीत दाखल करण्यात येते. ‘वेट फॉर हाईट’ च्या बालकांच्या आरोग्य विभागाच्या चमूतर्फे कुपोषित बालकांची ओळख निवड केली जाते. आधी ही बालके दिसत नव्हते. आरोग्य विभागाद्वारे कुपोषणावर आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. कुपोषित बालकांची ओळख पटविण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू होत आहे.