जनजागृती रॅलीचे आयोजन : जागतिक हिवताप दिवसानिमित्त जनजागृती गोंदिया : जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्यावतीने @२५ एप्रिल रोजी केटीएस नर्सींग स्कूल बीजीडब्लू स्त्री रुग्णालय येथे जागतिक हिवताप दिवस साजरा केला. या निमित्ताने केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातून शहरातील मुख्य मार्गावर जनजागृतीच्या उद्देशाने रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमती डॉ.भिसे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरु वात करण्यात आली. रॅलीमध्ये शासकीय निर्संग शाळा, बहेकार नर्सींग शाळेतील प्रशिक्षणार्थी, केटीएस व जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येत उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील शासकीय व खाजगी नर्सींग शाळेतील प्रशिक्षणार्थी, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानवरून डॉ.भिसे म्हणाल्या, हिवतापाकरीता अतिसंवेदनशील समजण्यात येणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात हिवताप या आजारावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना जनतेच्या सहकार्यामुळे यश प्राप्त झाले आहे. हिवताप या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळविण्यास आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना जनतेच्या सहकार्याची गरज असते. हिवतापाकरीता कारणीभूत असलेले रोगजंतूच्या शोधाचे जनक डॉ.सर रोनाल्ड यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलन करुन बीजीडब्लू रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.सी.आर.टेंभुर्णे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी सहायक जिल्हा हिवताप अधिकारी राऊत यांनी हिवताप या आजाराच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक कार्यवाई बाबत माहिती दिली. प्रास्ताविकेतून डॉ.टेंभूर्णे म्हणाले, जिल्ह्यातील मागील तीन वर्षाची आकडेवारी पाहता सन २०१५ मध्ये एकूण १४१५ हिवतापाचे रुग्ण दुषित आढळले. त्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. सन २०१६ मध्ये एकूण हिवतापाचे ९२० रु ग्ण दुषित आढळून आले, यात एका रु ग्णाचा मृत्यू झाला. सन २०१७ मध्ये जानेवारी ते मार्च अखेर एकूण ६५ रु ग्ण दुषित आढळले, यात मृत्यूचे प्रमाण शून्य असल्याचे सांगितले. मागील तीन वर्षाची हिवताप रूग्ण संख्या व मृत्यू संख्येची आकडेवारी पाहता, हिवताप दुषित रूग्ण व मृत्यू बरेच कमी झाल्याचे दिसून येते. यावर्षी जिल्ह्यात शून्य हिवताप मृत्यू संकल्पना राबविण्याचे या विभागाने ठरविले आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी गोंदिया यांनी सूचिवलेला मार्ग म्हणजे प्रत्येक गावात १०० टक्के शोषखड्डे तयार करु न डास उत्पत्ती स्थाने नष्ट करणे, दर आठवडी शनिवार हा दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा. जिल्ह्यात हिवताप वाढीची कारणे पाहता, जिल्ह्याची भौगोलीक परिस्थिती व भात शेतीच्या पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणात असल्याने साचलेल्या पाण्यात डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगितले. संचालन व आभार किशोर भालेराव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केटीएस नर्सींग शाळेचे सहायक प्राचार्या शहारे व सहयोगी श्रीमती मॉरटीन, निकिता दमके, ज्योती सदन, बहेकार नर्सींग शाळेचे प्राचार्य तसेच सहायक जिल्हा हिवताप अधिकारी राऊत, आरोग्य पर्यवेक्षक कुमरे, आरोग्य सहायक पराते यांनीसहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)
हिवताप मृत्यू शुन्यावर आणणार
By admin | Updated: April 27, 2017 01:01 IST