गोंदियातही होवू शकते मलाडची पुनर्रावृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 05:00 AM2020-08-30T05:00:00+5:302020-08-30T05:00:28+5:30

संततधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होऊन नुकसान होत आहे. शात शहरातील जीर्ण इमारतींबाबतही नियोजन करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा अप्रिय घटना टाळता येत नाही. करिता नगर परिषदेने जीर्ण इमारतीचे सर्वेक्षण केले असून १६८ जीर्ण इमारत असलेल्या मालकांना नोटीस पाठवून मोकळे होण्यातच धन्यता मानल्याचे चित्र आहे. दरवर्षी पावसाळा आला की जीर्ण इमारतींचा प्रश्न पुढे येतो.

Malad's recurrence may also occur in Gondia | गोंदियातही होवू शकते मलाडची पुनर्रावृत्ती

गोंदियातही होवू शकते मलाडची पुनर्रावृत्ती

Next
ठळक मुद्देशहरातील १६८ इमारती धोकादायक : नोटीस देऊन नगर परिषद मोकळी : वेळीच कारवाईची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आठवडाभरापूर्वीच मलाड येथील जीर्ण इमारत कोसळून पाच जणांचा जीव गेला तर अनेक जण जखमी झाले. जीर्ण झालेल्या इमारती वेळीच पाडण्याची कारवाई स्थानिक प्रशासनाकडून केली जात नसल्यानेच अशा घटना घडत आहे. गोंदिया शहरात सुध्दा १६८ जीर्ण इमारती असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र नगर परिषदेने अद्यापही याची दखल घेतली नसल्याने गोंदियातही मलाडच्या घटनेची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संततधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होऊन नुकसान होत आहे. शात शहरातील जीर्ण इमारतींबाबतही नियोजन करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा अप्रिय घटना टाळता येत नाही. करिता नगर परिषदेने जीर्ण इमारतीचे सर्वेक्षण केले असून १६८ जीर्ण इमारत असलेल्या मालकांना नोटीस पाठवून मोकळे होण्यातच धन्यता मानल्याचे चित्र आहे. दरवर्षी पावसाळा आला की जीर्ण इमारतींचा प्रश्न पुढे येतो. जीर्ण इमारतीं संदर्भात ओरड वाढल्यानंतर नगर परिषद इमारत मालकांना नोटीस देऊन मोकळी होते. पण अद्यापही एकही जीर्ण झालेली इमारत नगर परिषदेने धडक कारवाई करीत पाडल्याचे ऐकिवात नाही.दोन दिवसांपूर्वीच शहरातील दुर्गा चौक परिसरातील एक जीर्ण इमारत कोसळली. सुदैवाने यात कुठलेही जिवित हानी झाली नाही. शहरात अशा अनेक जीर्ण इमारती असून त्याची नोंद सुध्दा नगर परिषदेकडे आहे. पण कारवाई करण्यासाठी कुचराई केली जात आहे. पावसाळ््यात माती तसेच जुन्या जीर्ण झालेल्या इमारती पडण्याच्या घटना घडतात. मलाड येथे नुकताच हा प्रकार घडला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाच प्राण हानीही झाली आहे. जीवापेक्षा जास्त किंमती वस्तू दुसरी नाही. मात्र घर पडल्यानंतर अवघे कुटुंबच उघड्यावर येते. अशात पावसाळ््यात अशा घरांमध्ये राहणे म्हणजे जीव धोक्यात घालण्याचाच प्रकार असतो.जिल्ह्यात यंदा संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांची अंशत: व पूर्णत: पडझड झाली आहे. पावसाळ््यात निर्माण होणाऱ्या या धोक्याची कल्पना लक्षात घेत नगर परिषदेने नगर रचना विभागामार्फत शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण करवून घेतले. यात १६८ इमारती जीर्ण आढळून आल्या आहेत. या इमारत मालकांना नगर परिषदेने नोटीस बजावली. यातील काही इमारती जीर्ण व धोकादायक आहेत. काही वास्तव्यासाठी अयोग्य असून निष्काशीत करावयाच्या आहेत. काहींना दुरूस्तीची गरज असल्याचे दिसून आले आहे. मात्र संबंधितांना नगर परिषदेच्या नोटीस नंतरही त्यावर काहीच पावले उचललेली दिसत नाही.

जीर्ण इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट नाही
शहरातील जीर्ण आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून कायम आहे. पण अद्यापही इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन त्या इमारती पाडण्याची कारवाई करण्यात आली. तर बऱ्याच जीर्ण झालेल्या इमारती या बड्या व्यक्तींच्या असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी नगर परिषदेकडून कुचराई केली जात आहे.

अन्यथा अप्रिय घटनेची शक्यता
मलाड येथे घडलेल्या प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. अशात नगर परिषदेने शहरातील जीर्ण इमारतीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वेळीच कारवाई करण्याची गरज आहे. दरवर्षी नगर परिषद सर्वेक्षण करते व त्या पलीकडे काहीच होत नाही.आता मात्र मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी वेळीच कारवाई करण्याची गरज आहे अन्यथा मलाडच्या घटनेची पुनर्रावृत्ती येते टाळता येणार नाही.

Web Title: Malad's recurrence may also occur in Gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.