भवभूतींचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावे

By Admin | Updated: February 5, 2016 01:17 IST2016-02-05T01:17:55+5:302016-02-05T01:17:55+5:30

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब देवरस यांचे समरसतेचे कार्य भवभूती शिक्षण संस्था पुढे नेत आहे, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.

To make the work of Bhavbhuti reach to the commoners | भवभूतींचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावे

भवभूतींचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावे

पालकमंत्री बडोले : संघी टॉपर्स अवॉर्डचे वितरण
आमगाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब देवरस यांचे समरसतेचे कार्य भवभूती शिक्षण संस्था पुढे नेत आहे, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. महाकवी भवभूतींच्या जीवनाबद्दल लोकांना माहिती व्हावी यासाठी संस्थेने विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. स्व.लक्ष्मणराव मानकर गुरूजी जयंती समारंभात गुरूवारी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अप्पाजी स्वामी (तामिळनाडू) होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला आदर्श विद्यालयातील गुरूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले. तसे महाकवी भवभूतीच्या प्रतिमेला माल्यार्पण केल्यानंतर अतिथींनी मेजर ध्यानचंद क्रीडागृहाचे लोकार्पण केले. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, गडचिरोलीचे खा.अशोक नेते, भाजप प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर, आ.संजय पुराम, आ.विजय रहांगडाले, फुलबन मानकर, संस्थेचे कार्यवाह माजी आ.केशवराव मानकर, अध्यक्ष सुरेश असाटी, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अतिथींचा संस्थेचे कार्यवाह, अध्यक्ष व संचालक मंडळाने स्मृतिचिन्ह व शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. प्रास्ताविक व अहवाल वाचन कार्यवाह केशवराव मानकर यांनी केले.
यावेळी गुरूजींसोबत काम करणारे कार्यकर्ते नत्थुलाल ठाकुर, प्रेमलाल चौधरी, बाबुलाल अग्रवाल, मोतीलाल कुकरेजा, बाबुलाल उपराडे, प्रेमलाल बोपचे यांचा स्मृतिचिन्ह व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. संघी परिवारातर्फे आमगाव तालुक्यात प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संघी टॉपर्स अवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आला.
संयोजक प्राचार्य डॉ. श्रीराम भुस्कुटे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमात फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.दिलीप संघी, आदर्श विद्यालयाचे प्राचार्य जी.आर. मच्छिरके, रामकृष्ण विद्यालयाचे प्राचार्य दिनेश राऊत, रविंद्र विद्यालयाचे प्राचार्य के.ए.हुकरे, पॉलीटेक्नीकचे प्राचार्य संदीप हनुवते, बी.एड.चे प्रभारी जयंत बन्सोड, डी.एड.च्या प्राचार्या सहुल, के.के.इंग्लिश प्राथमिकच्या प्राचार्या रहांगडाले, आदर्श वाचनालयाचे अध्यक्ष बालाप्रसाद दुबे, भवभूती पतसंस्थेचे अध्यक्ष झेड.एस.बोरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)१६७ रक्तदात्यांचा केला गौरव
जयंती समारोहाच्या निमित्ताने आदर्श वाचनालय, भवभूती महाविद्यालय, मानकर ग्रुप आॅफ इन्स्टीट्युट्स इत्यादी स्थानांवर रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात १६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

Web Title: To make the work of Bhavbhuti reach to the commoners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.