आध्यात्मिक, सामाजिक राजकीय कार्य करा

By Admin | Updated: March 27, 2016 01:58 IST2016-03-27T01:58:15+5:302016-03-27T01:58:15+5:30

देश समाज आणि परिवाराचा मानसन्मान आणि स्वाभीमान यांचा गौरव वाढविण्यासाठी आमचे लक्ष्य असले पाहिजे.

Make spiritual, social, political work | आध्यात्मिक, सामाजिक राजकीय कार्य करा

आध्यात्मिक, सामाजिक राजकीय कार्य करा

सोनपुरी : देश समाज आणि परिवाराचा मानसन्मान आणि स्वाभीमान यांचा गौरव वाढविण्यासाठी आमचे लक्ष्य असले पाहिजे. एकता आणि बंधुताला मजबूत करण्यासाठी आध्यात्मिक सामाजिक आणि राजनैतिक कार्य केले पाहिजे. त्यासाठी लोधी समाज केंद्रस्थानी असावा. लोधी समाज केंद्राचे यादीमध्ये ओबीसी प्रवर्गात यावा यासाठी सदैव तत्पर असल्याचे उद्गार विश्व विदुषी साधना भारती यांनी काढले.
लोधी कर्मचारी संघ गोंदिया शाखा सालेकसा व लोधी समाज तहसील सालेकसा यांच्या संयुक्त विद्यमाने अमर शहीद विरांगणा महारानी अवंतीबाई लोखी यांच्या १५८ व्या बलिदान दिनाचे कार्यक्रम बाजार चौक गोवारीटोला (कावराबांध) येथे घेण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून लोध,लोधा, लोधी समाज दिल्लीचे अध्यक्ष राजेश राजपूत, पूरनसिंह पटेल, लोधी समाज रायपुरचे अध्यक्ष सुरेश सुलाखे, सचिव प्रल्हाद दमाहे, रणजितसिंह मच्छिरके, देवेंद्र मच्छिरके, बजरंग दलाचे तालुका संयोजक बद्रीप्रसाद दसरिया, गौपाल बनोठे, उपसरपंच यादन नागपुरे, लोधी कर्मचारी संघ सालेकसाचे अध्यक्ष लेखचंद दसरिया, सचिव टी. आर. लिल्हारे, जिल्हा प्रतिनिधी आर.एस.बसोने, कोषाध्यक्ष गणेश नागपुरे, माजी सरपंच गजानन मोहारे, रामेश्वर दसरिया उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात भगवान लोधेश्वर व अमर शहीद विरांगणा अवंतीबाई लोधी यांच्या प्रतिमेचे माल्यार्पणाने झाली. प्रास्ताविक आयोजन समितीचे संयोजक राजीव ठकरेले, संचालन अध्यक्ष शिवराम सव्वालाखे तर आभार सचिव प्रितम लिल्हारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी दयाराम तिवडे, शिव नागपुरे, कमलकिशोर लिल्हारे, उमेश बंबारे, कृष्णकुमार लिल्हारे, सुरेश लिल्हारे, संदीप नागपुरे, राजकुमार बसोने, रणजितसिंह मच्छिरके, नंदकिशोर बिरनवार, गरीमा मुटकुरे, भोगवंती ठकरेले, रामेश्वर लिल्हारे, सुर्यकांत नागपुरे, सुनिल नागपुरे, योगेश लिल्हारे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Make spiritual, social, political work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.