रस्ता वळणमार्ग व्यवस्थित बनवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:00:09+5:30

सायकलस्वार व दुचाकी स्वार या ठिकाणी पडतात व अपघात होतो. शालेय विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी कित्येकदा पडलेले आहेत. या बाबीची जाणीव पंचायत समिती सभापती रहांगडाले यांना मिळताच घटनास्थळी जावून संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना रस्ता योग्यरित्या बनवावा असे सांगितले.

Make the road turn right | रस्ता वळणमार्ग व्यवस्थित बनवा

रस्ता वळणमार्ग व्यवस्थित बनवा

ठळक मुद्देनीता रहांगडाले : अन्यथा जनआंदोलनाचा ईशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : सर्रा-वडेगाव पासून बिर्सी फाटा पर्यंत सिमेंट-कॉँक्रीटचा रस्ता बनत आहे. परंतु पायली टाकताना दुसरी बाजू बनविताना नुसती गिट्टी टाकून कसातरी थातूर-मातूर रस्ता बनविला जात आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. हा रस्ता व्यवस्थीत करा, गिट्टीवर मुरुम टाकून रोलर फिरवून बनवा अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असा ईशारा पंचायत समिती सभापती नीता रहांगडाले यांनी दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार, वडेगाव, सातोना, बोपेसर, लाखेगाव येथून सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे काम जोरात सुरु आहे. परंतु रस्ता बनवितांना मधामधात पाणी जाण्यासाठी पायल्या टाकल्या जातात. अर्र्धा रस्ता बनवून पायल्या टाकतात व रस्ता बाजूचा बनवितात. तो रस्ता मात्र निकृष्ट बनवून फक्त गिट्टी टाकण्यात आली. त्यामुळे सायकलस्वार व दुचाकी स्वार या ठिकाणी पडतात व अपघात होतो. शालेय विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी कित्येकदा पडलेले आहेत. या बाबीची जाणीव पंचायत समिती सभापती रहांगडाले यांना मिळताच घटनास्थळी जावून संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना रस्ता योग्यरित्या बनवावा असे सांगितले. असे न केल्यास तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला. हा रस्ता व्यवस्थित न बनत असल्याने या ठिकाणावर धुळीचे साम्राज्य असते. धुळीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या रस्त्याने रहदारी करणाºया नागरिकांंना श्वसन व डोळ्यांच्या आजारात वाढ होण्याची शक्यता आहे. करिता हा रस्ता तत्काळ व्यवस्थीत करावा अशी मागणी रहांगडाले यांनी केली आहे.

Web Title: Make the road turn right

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.