बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करा

By Admin | Updated: June 20, 2016 01:36 IST2016-06-20T01:36:46+5:302016-06-20T01:36:46+5:30

महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या अनेक योजना राबविल्या जातात. महिलांना सक्षम बनविण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायीक प्रशिक्षण व कर्जपुरवठा कमी व्याजदरात दिला जातो.

Make a financial uplift through a savings group | बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करा

बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करा

दिलीप चौधरी यांचे प्रतिपादन : महिला बचत गटांची आमसभा
गोरेगाव : महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या अनेक योजना राबविल्या जातात. महिलांना सक्षम बनविण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायीक प्रशिक्षण व कर्जपुरवठा कमी व्याजदरात दिला जातो. याचा फायदा घेऊन महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून प्रशिक्षण व कर्ज घेऊन व्यवसाय करावा. जेणेकरून त्यांना आपली आर्थिक प्रगती करता येईल, असे प्रतिपादन पं.स. सभापती दिलीप चौधरी यांनी केले.
तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्रातर्फे पंचायत समिती सभागृहात गुरूवारी महिला बचत गटांची आमसभा घेण्यात आली. या आमसभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. खंडविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून सुनील सोसे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुष्पराज जनबंधू, एस.एम. जाधव, कृषी अधिकारी रामटेके, पं.स. बचत गट समन्वयक बोपचे, तेजस्विनी लोक संचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक योगिता राऊत उपस्थित होत्या.
यावेळी सोसे म्हणाले, बचत गटाच्या महिलांना शासनाचे व्यावसायीक प्रशिक्षण घेऊन बचत गटातून कमी व्याजदरावर कर्जपुरवठा व अनुदान, याद्वारे आपली आर्थिक उन्नती साधना येते व परिवाराची आर्थिक अडचण नेहमीसाठी दूर करता येते. बचत गटाच्या माध्यमातून गावातील अनेक परिवारातील महिलांना सामूहिक काम व दाम मिळविता येते. म्हणून स्वयंसिद्ध उद्योजिका बनन्याचा बचत गटाच्या माध्यमातूनच प्रयत्न करा असे मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील अनेक महिला बचत गटाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. उत्कृष्ट व्यवसाय करणाऱ्या महिलांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यात रस घेणाऱ्या व १ जुलै रोजी वृक्ष लागवडीसाठी स्वेच्छेने महिला बचत गटांचे नाव नमूद करणाऱ्या महिलांना वृक्ष लागवडीचे महत्व आरएफओ एस.एम. जाधव यांनी सांगितले. संचालन विभा नंदेश्वर यांनी केले. आभार पदमा सरोजकर यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: Make a financial uplift through a savings group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.